शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये हिंसाचार थांबविण्यास काय केले?; अहवाल द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 09:24 IST

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर याचिकांची १० जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे.

नवी दिल्ली/इंफाळ : जातीय हिंसाचारग्रस्त राज्यात पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी घेतलेल्या पावलांचा तपशीलवार अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मणिपूर सरकारला दिले. दरम्यान, दिवसभरात बिष्णुपूरमध्ये ४ जणांची हत्या करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर याचिकांची १० जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. खंडपीठाने राज्य सरकारतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना अद्ययावत स्थिती अहवाल दाखल करण्यास सांगितले. त्यामध्ये पुनर्वसन शिबिरे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उचललेली पावले आणि शस्त्रे जप्त करणे, यांसारखे तपशील असावेत, असे खंडपीठाने म्हटले आहे.दरम्यान, काँग्रेसने मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराबद्दल मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीत निदर्शने केली.

सरकार काय म्हणाले?मेहता यांनी सुरक्षा दलांची तैनाती आणि अलीकडील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली. राज्यातील संचारबंदीचा कालावधी आता २४ तासांवरून पाच तासांवर आणण्यात आला आहे. राज्यात पोलिस, भारतीय राखीव बटालियन आणि सीएपीएफच्या ११४ कंपन्याही तैनात आहेत. 

कुकी गटाने काय म्हटले?कुकी गटांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये, असेही ते म्हणाले.अतिरेकी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिसले आणि त्यांनी ते  कुकी गटांचा नाश करतील, अशी धमकी दिली, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. कुकी गटांविरुद्धचा हिंसाचार राज्य प्रायोजित आहे.

उद्योजक संकटातदोन महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार होत असताना, राज्यातील व्यापारी, उद्योजकांचे भवितव्य अंधारात आहे. राज्याचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. हिंसाचारामुळे आम्ही कित्येक वर्षे मागे पडलो आहोत, असे व्यापाऱ्यांनी म्हटले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार