शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’मध्ये फसवणूक करणारा डॉक्टर झाल्यास काय होईल?; सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला सुनावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 07:23 IST

राष्ट्रीय पात्रता प्रवेशपरीक्षेशी (पदवी)-२०२४ संबंधित खटल्याला विरोधी मानले जाऊ नये, असेही न्यायालयाने सुनावले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नीट-यूजी २०२४ च्या परीक्षेत कोणाकडूनही ‘०.००१ टक्के निष्काळजीपणा झाला असला तरी, तरी ठोस करवाई व्हायला हवी. या परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतात, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले.

राष्ट्रीय पात्रता प्रवेशपरीक्षेशी (पदवी)-२०२४ संबंधित खटल्याला विरोधी मानले जाऊ नये, असेही न्यायालयाने सुनावले. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि एस. व्ही. एन. भाटी यांच्या सुटीतील खंडपीठाने केंद्र आणि राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांना सांगितले की, कोणाच्याही बाजूने ०.००१ टक्के निष्काळजीपणा असला तरीही, त्यावर सखोल कारवाई केली पाहिजे.” ५ मे रोजी झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वाढीव गुणांसह तक्रारी मांडणाऱ्या दोन स्वतंत्र याचिकांवर खंडपीठात सुनावणी सुरू होती.

- “कल्पना करा की ज्या व्यक्तीने यंत्रणेची फसवणूक केली आहे आणि तो डॉक्टर होतो. ते समाजासाठी अधिक हानिकारक आहे. 

- परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्थांचे प्रतिनिधित्व करताना, तुम्ही खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. जर काही चूक झाली असेल, तर होय ही एक चूक आहे आणि आम्ही ही कारवाई करणार आहोत, असा दिलासा द्यायला हवा होता. 

- कमीत कमी त्यामुळे तुमच्या कामगिरीवरील विश्वास वृद्धिंगत झाला असता,” असे खंडपीठाने एनटीएच्या वकिलांना सांगितले.

नीट परीक्षेतील घोटाळेबाजांवर कारवाई करानीट गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करा, परीक्षेतील घोटाळेबाजांवर कारवाई करा, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरत असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर आणि चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चे काढून सरकारचा निषेध केला. 

आम आदमी पार्टीची जंतरमंतरवर निदर्शनेराष्ट्रीय पात्रता प्रवेशपरीक्षेत (नीट) कथित अनियमिततेच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी जंतरमंतर येथे निदर्शने केली. 

काँग्रेस तरुणांसाठी आवाज उठवणारनीट परीक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेस रस्त्यावर व संसदेत तरुणांचा आवाज जोरदारपणे उठविण्यासाठी कटिबद्ध आहे. बिहार, गुजरात व हरयाणामध्ये झालेल्या अटकेवरून स्पष्टपणे दिसून येते की परीक्षेत नियोजनबद्ध पद्धतीने भ्रष्टाचार झाला आणि ही भाजपशासित राज्ये पेपरफुटीचे केंद्र बनली आहेत.- राहुल गांधी, काँग्रेस नेते

परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या वसमतमधील (जि. हिंगोली) : विद्यानगर भागात दीपिका दौलत खंदारे (१७, रा. आहेरवाडी, ता. पूर्णा, जि. परभणी) या विद्यार्थिनीने नीट परीक्षेच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालexamपरीक्षा