शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

त्या रात्री जलवायू विहारच्या एल-32 बंगल्यात काय घडल होतं ? आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 09:36 IST

संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालय आज  निकाल देणार आहे.

ठळक मुद्देराजेश आणि नुपूर तलवार सध्या गाजियाबादच्या डासना जेलमध्ये बंद आहेत.आरुषी तलवार दांम्पत्याची एकुलती एक मुलगी होती.

नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालय आज  निकाल देणार आहे. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई-वडिल राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णया विरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज निकाल येणार आहे. 

राजेश आणि नुपूर तलवार सध्या गाजियाबादच्या डासना जेलमध्ये बंद आहेत. न्यायमूर्ती बीके नारायण आणि न्यायमूर्ती एके मिश्रा यांच्या खंडपीठाने सात सप्टेंबरला निर्णय राखून ठेवला होता. आरुषी तलवार दांम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008 च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 

तलवार यांच्या घरी काम करणारा नोकर हेमराज गायब असल्याने सर्वप्रथम त्याच्यावर हत्येचा संशय होता. पण दुस-या दिवशी 17 मे रोजी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडला. या प्रकरणात न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना दोषी ठरवले असले तरी, अजूनही या संपूर्ण प्रकरणाबद्दल रहस्य कायम आहे. उच्च न्यायालय निकाल सुनावताना या दोन्ही हत्या का झाल्या? त्यामागे काय उद्देश होता? त्याबद्दल निरीक्षण नोंदवू शकते. 

एकूणच या दोन्ही हत्यांभोवती रहस्य असल्याने प्रसारमाध्यमांनी त्यावेळी हे प्रकरण उचलून धरले होते. एक प्रकारची मीडिया ट्रायल सुरु असल्याने पोलिसांवर दबाव होता. उत्तरप्रदेश पोलिसांनी ऑनर किलिंगमधून या दोन्ही हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला होता. अखेर तत्कालिन मुख्यमंत्री मायावतींनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवले. 

या प्रकरणाच्या तपासात अनेक नाटयमय वळणे आली. सीबीआयच्या दोन प्रमुख अधिका-यांनी परस्परविरुद्ध निष्कर्ष काढला. अरुण कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला. तलवार यांचा कम्पाऊंडर क्रिष्णा, शेजारच्या बंगल्यात काम करणारे दोन नोकर विजय मंडल आणि राजकुमार यांना अटक केली. त्यांची नार्को चाचणी केली. पण सीबीआयला तिघांविरोधात आरोपपत्र दाखल करता न आल्याने त्यांची सुटका झाली. 

दुस-या टीमला आरुषीच्या आई-वडिलांवर संशय होता. पण सबळ पुराव्याअभावी त्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला. पण सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावला. 

टॅग्स :Aarushi murderआरुषी हत्याhemraj murderहेमराज हत्या