शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १३ तासांत काय घडलं? गर्भवती महिलेच्या पतीने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा थरारक अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 15:47 IST

माझ्या पत्नीला रात्री त्रास होत होता, तिच्या कमरेत दुखत होतं. त्यानंतर श्वास घेण्यास अडचण आली, तिला ईएसआय रुग्णालयात घेऊन गेलो, इमरजेन्सी वार्डमध्ये तिला शिफ्ट केले, हॉस्पिटलला जाताना ती चालत होती, फक्त कमरेत दुखत होतं.

ठळक मुद्देमाझ्या पत्नीला रात्री त्रास होत होता, तिच्या कमरेत दुखत होतं. त्यानंतर श्वास घेण्यास अडचण आलीहॉस्पिटलला जाताना ती चालत होती, फक्त कमरेत दुखत होतं. रुग्णालयात नर्स आणि डॉक्टरांकडून अमानुष वागणूक दिल्याचा आरोप

नोएडा – दोन दिवसांपूर्वी नोएडा येथील एका ८ महिन्याच्या गर्भवती महिलेचा उपचाराविना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती, या महिलेला १३ तास विविध हॉस्पिटलमध्ये जाऊनसुद्धा कोणीही दाखल करुन घेतले नाही, त्यामुळे अखेर या महिलेचा उपचाराविना मृत्यू झाला. या घटनेतील आणखी कटू सत्य आता महिलेच्या पतीने उघड केले आहे.

गर्भवती पत्नी मरणाच्या दारात असताना पती बृजेंद्र सिंहला विचारत होती, माझ्यावर उपचार का होत नाहीत? पीडित गर्भवतीला त्रास होत असतानाही तिला कानाखाली मारण्याची धमकी आणि अमानुषपणे वागणूक दिली असा आरोप पतीने केला. नोएडाच्या एका हॉस्पिटलमध्ये पत्नीचा मास्क किंचित खाली आला त्यामुळे पीपीई किट घातलेल्या नर्सने तिला कानाखाली मारेन, मास्क वर घे अशाप्रकारे धमकी दिली. वेदनेने त्रस्त असलेल्या रुग्णासोबत अशाप्रकारे वागणूक केल्याने पतीने उपचाराविना घरी राहू पण अशा वागणुकीमुळे हॉस्पिटलमध्ये कोणी जाणार नाही असं सांगितले.

माझ्या पत्नीला रात्री त्रास होत होता, तिच्या कमरेत दुखत होतं. त्यानंतर श्वास घेण्यास अडचण आली, तिला ईएसआय रुग्णालयात घेऊन गेलो, इमरजेन्सी वार्डमध्ये तिला शिफ्ट केले, हॉस्पिटलला जाताना ती चालत होती, फक्त कमरेत दुखत होतं. डॉक्टरांनी तिला तपासून युरिनची थैली लावली आणि नवऱ्याला बोलवायला सांगितले, मी पोहचल्यानंतर डॉक्टरांनी मला ओरडत हिला मरायला इथे आणलं का? असा प्रश्न केला. नर्सची अशी वागणूक आणि डॉक्टरांनी ओरडल्यामुळे माझी पत्नी घाबरली, एक दीड तासानंतर आम्हाला उपचाराविना हॉस्पिटलमधून जायला सांगितले.

त्यानंतर पत्नीला घेऊन आम्ही जिल्हा सरकारी रुग्णालयात गेलो, त्याठिकाणी आम्ही व्हिलचेअरवरुन पत्नीला दवाखान्यात नेले, तिथे डॉक्टरांनी तिला पाहताच उपचार होणार नाहीत, तुम्ही येथून घेऊन जा असं सांगितले. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या पत्नीवर उपचार सुरु असणाऱ्या शिवालिक हॉस्पिटलला पोहचलो, आम्हाला वाटलं त्याठिकाणी दाखल करुन घेतील, पण त्याठिकाणीही आमची अपेक्षा भंग झाली. त्यानंतर फोर्टिस हॉस्पिटलला तिला घेऊन गेलो.

फोर्टिस हॉस्पिटला गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं पत्नीची तब्येत गंभीर झाली आहे. तिला इथे उपचार करता येणार नाहीत, तिला व्हेंटिलेटरवर ठेवायला लागेल, हवं ते करा पण तिच्यावर उपचार करा असं विनवणी डॉक्टरांना वारंवार केली, त्यानंतर त्यांनी ५-६ लाख रुपये मागितले तर देशील का? असं विचारलं, तर मी पैशाचा बंदोबस्त करतो पण उपचार करा असं सांगितल्यानंतर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, तिला येथून घेऊन जा असं सांगितले. यानंतर तिथून पुन्हा जिम्स आणि शारदा हॉस्पिटला घेऊन गेलो तिथेही दाखल करण्यात आलं नाही,

अखेर वैशालीच्या मॅक्स हॉस्पिटलच्या इमरजेन्सी वार्डमध्ये पोहचलो, तिथे डॉक्टरांनी आमच्याकडे बेड्स उपलब्ध नाहीत सांगितले, परत आम्ही जिम्स हॉस्पिटलला आलो, पण रुग्णवाहिकेला हॉस्पिटलच्या गेटवरच अडवले, त्यावेळी थोड्यावेळानंतर आम्ही पत्नी निलमकडे पाहिले तिचा मास्क काढला त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याचं आढळलं, माझ्यावर उपचार का होत नाहीत, मला दाखल का करु घेतलं जात नाही, मी मरेन असं वारंवार पत्नी नवऱ्याला सांगत राहिली पण अखेर तेच खरं ठरलं, या लोकांनी माझ्या पत्नीची आणि मुलाची हत्या केली आहे. माझी पत्नी मुलाला जन्म देणार होती, दोन दिवसानंतर माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, आमच्या घरात आनंद साजरा होणार होता, पण आता त्याची आई परत येणार नाही हे त्या मुलाला कसं सांगणार अशी व्यथा पती बृजेंद्र सिंह यांनी मांडली.   

टॅग्स :hospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिला