शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानशी मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 11:29 IST

भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानचे वर्तन असेच राहिले. ते दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिले. त्यांच्यासोबत मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ आहेसध्या भारत केवळ आपल्या वाट्याचे पाणी रोखत आहे. मात्र  पाकिस्तानचा व्यवहार न सुधारल्यास त्यांना एक थेंबही देणार नाही

नवी दिल्ली - भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे. पाकिस्तानचे वर्तन असेच राहिले. ते दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिले. त्यांच्यासोबत मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच सध्या भारत केवळ आपल्या वाट्याचे पाणी रोखत आहे. मात्र  पाकिस्तानचा व्यवहार न सुधारल्यास त्यांना एक थेंबही देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  पाकिस्तानचे पाणी रोखण्याच्या प्रश्नाबाबत गडकरी म्हणाले की, पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा निर्ण हा केवळ माझ्या खात्याचा नसेल. सरकार, पंतप्रधान यांच्या स्तरावर हा निर्णय होईल. पण मी माझ्या खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या खात्यांना पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी कुठे कुठे रोखता येईल, याबाबत तांत्रिक आराखडा बनवण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.'' 

दरम्यान,  पाकिस्तानची सार्वत्रिक कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास भारताने तयारी सुरू आहे. आता सिंधू जल करारातून माघार घेण्याच्या दिशेने भारताने पावले उचलली असून, त्यानुसार काश्मीर खोऱ्यातून पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी मोठी धरणे बांधून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. त्याचा फायदा जम्मू काश्मीर आणि पंजाबसह इतर राज्यांना होणार आहे, असे ट्विट नितीन गडकरी यांनी काल केले होते. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धखोरीची धमकी दिलेली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तोंडचे पाणी पळविण्याचा थेट इशाराच देऊन टाकला होता. पुलवामा आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गडकरी यांनी केलेले महत्वाचे मानले जात होते. दरम्यान, आज अखेरीस यासंदर्भातील घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरNitin Gadkariनितीन गडकरीPakistanपाकिस्तान