शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोना म्हणजे काय असते? मंदिरे, गुरुद्वारांमध्ये दिवसभर रांगा; तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 05:42 IST

 कॅनाॅट प्लेसमध्ये माेठ्या प्रमाणावर नववर्षाचा जल्लाेष साजरा केला जाताे. यावर्षी रात्री १० वाजेनंतर संपूर्ण दिल्लीत संचारबंदी लागू केल्याने गजबज राहणाऱ्या या भागातील रस्त्यांवर यावर्षी केवळ पाेलिसांची वाहने फिरत हाेती. 

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीत संचारबंदी लागू असल्याने रात्री दहानंतर जल्लाेषाला मुकलेल्या दिल्लीकरांनी शनिवारी दिवसभर प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी केली हाेती. दिल्लीतील बाजारपेठांमध्येही गर्दी दिसून आली.

 कॅनाॅट प्लेसमध्ये माेठ्या प्रमाणावर नववर्षाचा जल्लाेष साजरा केला जाताे. यावर्षी रात्री १० वाजेनंतर संपूर्ण दिल्लीत संचारबंदी लागू केल्याने गजबज राहणाऱ्या या भागातील रस्त्यांवर यावर्षी केवळ पाेलिसांची वाहने फिरत हाेती. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लाेकांची मंदिरे व गुरुद्वारांमध्ये दिवसभर गर्दी दिसून आली. ल्यूटन्स भागातील बांगला साहिब गुरुद्वारा, रकाबगंज गुरुद्वारा, लक्ष्मीनारायण मंदिरांमध्ये लाेकांच्या रांगा दिसून आल्या. दिल्लीत काेराेना संक्रमणाचा धाेका वाढत असतानाही लाेकांची गजबज प्रार्थनास्थळांमध्ये दिसून आली.

बाजारपेठा फुलकॅनाॅट प्लेस, गाेलमार्केट, सराेजनी नगर, कराेलबाग, या बाजारपेठांमध्येही लाेकांनी गर्दी केली हाेती. दिल्ली सरकाराने काही बाजारपेठांमध्ये ऑड ईव्हनचे नियम लागू केले आहेत. मेट्राे व डीटीसी बसमध्ये ५० टक्के प्रवासी प्रवास करीत असल्याने बस स्थानके व मेट्राे स्थानकांवर दिवसभर गर्दी दिसून आली. डीटीसी बस व मेट्राे स्थानकांवर लाेकांना अर्धा ते एक तास वाट पाहावी लागत आहे. 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्बंधांचे उल्लंघन    देशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी पार्ट्या, धार्मिक वा सामाजिक सोहळे, समारंभ यांच्यावर जवळपास सर्वच राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. कुठेही ५० हून अधिक लोकांनी एकत्र येता कामा नये, असे आदेशच सरकार व पोलिसांनी काढले.      काही ठिकाणी पूर्ण जमावबंदीच होती. त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकांनी आपल्या कुटुंबांसह, अगदी लहान मुलाबाळांसह गर्दी केली ती मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांमध्ये, तसेच पर्यटनाच्या ठिकाणांकडे. वैष्णोदेवी मंदिर परिसरात शनिवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली, १२ जण मरण पावले, मात्र त्यापासून धडा न घेता तिथे सकाळी लोकांची दर्शनासाठी झुंबड उडाली होती. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातही शीख भाविकांनी एकच गर्दी केली होती. वाराणसीच्या काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यांवर हजारो भाविक जमले होते.  शारीरिक अंतर ठेवण्याच्या सूचनाही पायदळी तुडविण्यात आल्या.    श्रद्धा असावी, देवदर्शन घ्यावे, फिरायलाही जावे, पण हे करताना आपल्याला आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, हे पाहणे गरजेचे होते. मात्र, आपण सारे मिळून कोरोनाला निमंत्रण देणार नाही, याचे पथ्य कोणीच पाळले नाही. कोरोनाविषयक सर्व नियमांची सर्व ठिकाणी ऐशीतैशी झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या