शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा ज्यासाठी प्राण द्यायलाही तयार आहेत, तो अक्साई चीन नेमका आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:53 IST

गृहमंत्री अमित शहा यांनी पीओके आणि अक्साई चीन हे भारताचेच भाग आहेत, असे ठणकावताना त्यांच्यासाठी जीवही द्यायलाही तयार आहोत, असे विधान केले होते. 

नवी दिल्ली -  काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय संसदेने मंजूर केला. दरम्यान, यासंदर्भात लोकसभेत सादर केलेल्या विधेयकावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शहा यांनी पीओके आणि अक्साई चीन हे भारताचेच भाग आहेत, असे ठणकावताना त्यांच्यासाठी जीवही द्यायलाही तयार आहोत, असे विधान केले होते. अमित शहा म्हणाले की,''जम्मू काश्मीर हा भारताच अतूट भाग आहे. मी जेव्हा जम्मू काश्मीरचा उल्लेख करतो, तेव्हा त्यामध्ये पीओके आणि अक्साई चीनचाही समावेश असतो. काँग्रेस पीओकेला भारताचा भाग मानत नाही काय'' असा सवालही त्यांनी केला. अमित शहा यांनी उल्लेख केलेला अक्साई चीन म्हणजे काश्मीरचा नेमका कुठला भाग हे आता जाणून घेऊया. काय आहे अक्साई चीन अक्साई चीन हा भाग जम्मू काश्मीरचा एकूण 15 टक्के क्षेत्रफळ व्यापतो. या भागावर चीनने आक्रमण करून कब्जा केलेला आहे. अमित सहा यांनी काल लोकसभेत बोलताना अक्साई चीनसह संपूर्ण जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न भाग आहे, असे सांगितले. मात्र चीन अस्काई चीन झिजियांग उइगर प्रांतातील स्वायत्त भाग आहे, असा दावा नेहमी करत असतो.  अक्साई चीन समुद्र सपाटीपासून सुमारे 5 हजार मीटर उंचावर वसलेल्या सॉल्ट फ्लेटमधील एक विशाल वाळवंट आहे. या प्रदेशाचे क्षेत्रफळ सुमारे 37 हजार 244 चौकिमी आहे. जम्मू काश्मीर राज्यातीली उत्तर पूर्व भागातील या क्षेत्रापैकी मोठा भाग 1950 मध्ये चीनने बळकावला होता. चीनने या भागाला प्रशासकीय दृष्ट्या झिजियांग प्रांतातील काश्गर विभिगातील कार्गिलिक जिल्ह्याचा भाग बनवला आहे.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शहाArticle 370कलम 370