शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्या नेत्यांचे काय? विद्यमान १५१ जणांवर अत्याचाराचे तर १६ जणांवर बलात्कारचे गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 06:59 IST

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशातील १५१ विद्यमान खासदार आणि आमदारांवर महिलांविरोधातील गुन्हे दाखल असून, यात पश्चिम बंगालमधील सर्वाधिक खासदार आणि आमदार असल्याचे समोर आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

एडीआरने २०१९ ते २०२४ दरम्यान निवडणूक आयोगाला सादर केलेल्या विद्यमान खासदार आणि आमदारांच्या ४,८०९ प्रतिज्ञापत्रांपैकी ४,६९३ तपासली. त्यानंतर संबंधित १६ खासदार आणि १३५ आमदारांची माहिती समोर आली. हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या कथित बलात्कार आणि ठाण्याच्या मुलींवरील अत्याचाराबाबत देशभरात निदर्शने होत आहेत.

१० वर्षांची शिक्षा ? १६ विद्यमान खासदार आणि आमदार असे आहेत ज्यांच्यावर आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराशी संबंधित प्रकरणे नोंदवली आहेत, यात किमान १० वर्षांची शिक्षा आहे.

पुन्हा तिकीट देणार का? राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना, विशेषत: बलात्कार आणि महिलांवर अत्याचाराचे आरोप असलेल्यांना तिकीट देण्यापासून परावृत्त करावे. पोलिसांकडून कसून तपास व्हावा, अशी मागणी एडीआरने केली आहे.

पक्षनिहाय अत्याचाराचे गुन्हे असणारे नेते भाजप    ५४ काँग्रेस    २३ टीडीपी    १७ आप    १३ तृणमूल काँग्रेस     १० अपक्ष    ६राष्ट्रवादी काँग्रेस    १रासप    १प्रहार जनशक्ती पार्टी    १

टॅग्स :PoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी