शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आधार 'पीव्हीसी कार्ड' काय आहे? घरबसल्या कसं मिळवाल? जाणून घ्या...

By मोरेश्वर येरम | Updated: January 3, 2021 18:04 IST

आधार पीव्हीसी कार्डचा आकार हा बँकेच्या एटीएम किंवा डेबिट कार्डसारखा आहे.

ठळक मुद्देPVC Aadhar Card चे फायदे माहित्येत का?घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड मागवता येतंपीव्हीसी आधार कार्ड कसं मागवायचं याची संपूर्ण माहिती

नवी दिल्लीभारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) ऑक्टोबर २०१९ मध्ये आधार कार्डचं नवं प्रिटींग सुरू केलं आणि आधार पीव्हीसी कार्ड हे नवं कार्ड बाजारात आणलं. 

आधार पीव्हीसी कार्डचा आकार हा बँकेच्या एटीएम किंवा डेबिट कार्डसारखा आहे. त्यामुळे ते तुम्ही पाकिटात सहजपणे ठेवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही घरबसल्या तुमच्या एकाच मोबाइल क्रमांकावरुन संपूर्ण कुटुंबासाठी पीव्हीसी आधारकार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता. या पीव्हीसी आधारकार्डासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये शुल्क द्यावे लागेल. 

पीव्हीसी आधार कार्डचे फायदे>> पीव्हीसी कार्डची गुणवत्ता चांगली असल्यानं ते दीर्घकाळ टीकेल आणि पाकिटातही सहजपणे ठेवता येतं. >> पीव्हीसी कार्डमध्ये लॅमिनेशन केलं जात असल्यानं छापील माहिती देखील सुरक्षित राहते. >> आधार पीव्हीसी कार्डमध्ये होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्टसारखे सिक्यूरिटी फिचर्स देखील असतात. >> पीव्हीसी आधार कार्डद्वारे तुम्ही क्यूआर कोडच्या माध्यमातून तातडीने ऑफलाइन व्हेरिफिकेशन करता येतं. 

कसं कराल ऑनलाइन अप्लाय?:१. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

२.  'My Aadhaar Section' मध्ये जाऊन 'Order Aadhaar PVC Card' या पर्यायावर क्लिक करा

३. त्यानंतर तुमचा १२ अंकी आधार क्रमांक किंवा १६ अंकी व्हर्च्यूअल आयडी क्रमांकाची नोंद करा. 

४. सिक्यूरिटी चेकसाठी समोर दाखविण्यात येणारा 'कॅप्चा कोड' अचूक नोंदवा 

५. त्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा

६. आता तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP मिळेल. 

७. OTP क्रमांक नोंदवा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

८. तुमचा मोबाइल क्रमांक नोंदणीकृत नसेल तर "My Mobile number is not registered" या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यामध्ये तुमचा नोंदणीकृत नसलेला मोबाइल क्रमांक नोंदवा. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.

९. आता तुम्हाला पीव्हीसी कार्डची प्रीव्हू कॉपी दिसेल. 

१०. आता पेमेंट पर्यायावर क्लिक करुन ५० रुपयांचे शुल्क नेटबँकिंग किंवा यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून भरू शकता. 

११. शुल्क भरल्याचा मेसेज आल्यानंतर तुमचे आधार पीव्हीसी कार्ड देखील ऑर्डर केले जाईल.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डGovernmentसरकारIndiaभारत