कुजबूज--१० एप्रिल
By admin | Updated: April 11, 2015 01:40 IST
अच्छे दिन व गडकरी
कुजबूज--१० एप्रिल
अच्छे दिन व गडकरीनितीन गडकरी हे केंद्रात महामार्ग व वाहतूक मंत्री बनल्यापासून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला अच्छे दिन आले आहेत, असे भाजपवाल्यांमधील एका गटाला वाटते. अर्थात, केंद्रात जेव्हा यूपीए सरकार होते व ऑस्कर फर्नांडिस हे जेव्हा केंद्रीय महामार्ग मंत्री बनले होते, तेव्हाही ऑस्कर यांनी गोव्यासाठी काही प्रस्ताव मंजूर करून दिले होते. त्या वेळी गोव्याचे एक खासदार म.गो.चे मंत्री सुदिन ढवळीकर यांना सहकार्य करत नव्हते; पण काही प्रकल्प ढवळीकर यांनी मंजूर करून घेतले होते. आता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गोव्यात काही हजार कोटींची कामे मार्गी लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रस्ते, पूल वगैरे होतील. याचे श्रेय म.गो.ला जाते. त्यामुळे भाजपमधील एका गटाने गडकरी यांना दोन सभांमध्ये व एका पत्रकार परिषदेत एकच गोष्ट वारंवार बोलायला लावली. ती गोष्ट म्हणजे मोदी सरकारने हजारो कोटींचे प्रकल्प गोव्यास दिले. ...............................खुर्च्यांची गोष्टपर्वरी येथील संजय स्कूलची इमारत पाडली जात आहे. त्यामुळे संजय स्कूलमधील विद्यार्थ्यांचे तात्पुरते दुसर्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. तिथे पालक आले तर त्यांना व शिक्षकांना किंवा अन्य कुणाला बसण्यासाठी खुर्च्याही नव्हत्या. अनेक श्रीमंतांचीही मुले संजय स्कूलमध्ये आहेत; पण विद्यालयाला आपण खुर्च्या दान कराव्यात, असे कुणाला वाटले नाही. विद्यालयाच्या एका शिक्षिकेने सामाजिक कार्यकर्ते राजेश दाभोळकर यांच्याकडे खुर्च्यांचा विषय सहज उपस्थित केला व पाच खुर्च्या डोनेट करण्याची विनंती त्यांना केली. दाभोळकर यांनी शंभर खुर्च्या दिल्या. शुक्रवारी या जागेत संजय स्कूलचा मोठा कार्यक्रम झाला. संरक्षणमंत्र्यांसह सगळे व्हीआयपी या खुर्च्यांवर बसले. संजय स्कूलशीसंबंधित विविध समित्यांवर काम करणारे आता यापुढे तरी विद्यालयास काही दान करतील काय, हे पाहावे लागेल.