शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीला १० दिवसांची सुट्टी देतेय 'ही' कंपनी, बॉस म्हणाला...खूप काम केलं, आता कुटुंबासोबत मजा करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 19:04 IST

Diwali Vacation: देशभरात सणासुदीला सुरुवात झाली आहे आणि या सणासुदीच्या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची असते, पण कामाचा ताण त्यांच्या योजनेत मोठा अडथळा ठरतो.

Diwali Vacation: देशभरात सणासुदीला सुरुवात झाली आहे आणि या सणासुदीच्या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची असते, पण कामाचा ताण त्यांच्या योजनेत मोठा अडथळा ठरतो. ही समस्या लक्षात घेऊन, यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर WeWork च्या चीफ पीपल एंड कल्चर ऑफिसर प्रीती शेट्टी यांनी त्यांच्या भारतीय कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण १० दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. यंदा दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाची संपूर्ण दिवाळी कुटुंबीयांसोबत साजरी करा, असं कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. 

"ब्रँड म्हणून आमचे यश हे कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. १० दिवसांचा दिवाळी ब्रेक प्रत्येक WeWork कर्मचार्‍यांना त्यांच्या व्यग्र जीवनातून काही हास्याचे आणि मनोरंजनाचे क्षण देईल", असं प्रीती शेट्टी म्हणाल्या. या सणासुदीच्या हंगामात, न्यूयॉर्क स्थित ऑफिस स्पेस प्रोव्हायडर WeWork ने आपल्या भारतीय कर्मचार्‍यांना एक मोठी आणि अनोखी दिवाळी भेट दिली आहे. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठा ब्रेक देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. या अंतर्गत कर्मचारी आपले काम बंद करून आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करू शकतील असे सांगण्यात आले आहे. हे आपल्या कर्मचार्‍यांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देत घेण्यात आलेला निर्णय आहे.

कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि कंपनीप्रती निष्ठा वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे WeWork कंपनीचे म्हणणे आहे. कर्मचार्‍यांना व्यग्र दिनचर्येतून विश्रांती देणे आणि सणासुदीच्या काळात त्यांच्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. वी-वर्कच्या मते, एम्प्लॉई फर्स्ट या संकल्पनेखाली अशी पॉलिसी 2021 मध्ये पहिल्यांदा आणली गेली होती.

2022 मध्ये व्यवसाय मजबूत झालाकंपनीच्या चीफ पीपल आणि कल्चर ऑफिसर प्रीती शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंतचे 2022 हे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण आमचा व्यवसाय मजबूत झाला आहे. ब्रँड म्हणून आमचे यश हे आमच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. 10 दिवसांची दिवाळी सुट्टी म्हणजे WeWork कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कामासाठी केलेल्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. 

Meesho नेही दिली ११ दिवसांची सुट्टीएका अहवालानुसार, WeWork ची NCR, मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबादमधील ४० ठिकाणी ५ दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त मालमत्ता आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधी नुकतीच ऑनलाइन शॉपिंग साइट 'मीशो'नेही आपल्या कर्मचाऱ्यांना अशी बंपर ऑफर दिली होती. 'मीशो'ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत 11 दिवसांचा 'रीसेट आणि रिचार्ज' ब्रेक जाहीर केला आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021