शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींसाठी काय पण; त्याने स्वतःच्या लग्नपत्रिकेतून समजावला अख्खा राफेल करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 11:53 IST

गुजरातमधील युवराज आणि साक्षी या जोडप्याचा 22 जानेवारी रोजी विवाह आहे

अहमदाबाद - आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. त्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या हालचालीही सुरू आहेत. त्याचाच, एक भाग बनून भाजपा समर्थक नव नवी शक्कल लढवून मोदी सरकारचे समर्थन करत आहे. गुजरातमधील एका जोडप्याने लग्न पत्रिकेवर चक्क राफेल डीलबाबतचे मुद्दे छापले असून या करारात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे म्हटले आहे. 

गुजरातमधील या जोडप्याने लग्न पत्रिकेतून आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तर सोबतच राहुल गांधींच्या राफेल कराराबाबतच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. देशात पंतप्रधान मोदींच्या चाहत्यांची संख्या अद्यापही मोठी आहे. एकीकडे मोदींवर टीका होत असताना, दुसरीकडे मोदींवर प्रेम करणाऱ्यांचीही संख्या जगभरात आहेत. गुजरातमधील अशाच एक मोदीप्रेमी जोडप्याने चक्क लग्न पत्रिकेत राफेल डीलसंदर्भातील मुद्दे मांडले असून मोदींना आरोपमुक्त ठरवले आहे. 

गुजरातमधील युवराज आणि साक्षी या जोडप्याचा 22 जानेवारी रोजी विवाह आहे. त्यासाठी, निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. या लग्नपत्रिकेतील पहिल्या पानावर सर्वकाही नित्यनियमाप्रमाणे म्हणजेच सर्वसाधारण लग्नपत्रिकेप्रमाणे छापण्यात आले आहे. नवऱ्या मुलाचे नाव, नवरी मुलीचे नाव, लग्नाची वेळ ठिकाण, देवांचे फोटो आणि कुटुंबाची माहिती देण्यात आली आहे. मात्र, शेवटची एक ओळीतून मोदींना मतदान हेच आमचे गिफ्ट असे लिहिण्यात आले आहे. तर लग्न पत्रिकेच्या दुसऱ्या पानावर राफेल करारासंदर्भाची सर्व माहिती देण्यात आली आहे. ही लग्नपत्रिका इंग्रजीत असून राफेलची माहितीही इंग्रजीतच छापण्यात आली आहे. शांत रहा अन् मोदींवर विश्वास ठेवा... असे या पत्रिकेत छापण्यात आले आहे. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, कर्नाटक भाजपाच्या महिला सरचिटणीस शोभा करंडलाजे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही लग्नपत्रिका शेअर केली आहे. 

 

टॅग्स :marriageलग्नNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डीलGujaratगुजरात