शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना घरे देण्याच्या योजनेत पश्चिम बंगाल अव्वल; गुजरात-महाराष्ट्र मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 10:42 IST

बेघरांसाठी पक्की घरे बांधण्याच्या बाबतीत पश्चिम बंगाल हे देशातील आघाडीचे राज्य बनले आहे.

हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : बेघरांसाठी पक्की घरे बांधण्याच्या बाबतीत पश्चिम बंगाल हे देशातील आघाडीचे राज्य बनले आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत सदैव अग्रेसर राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातही याबाबतीत मागे पडले आहे. महाराष्ट्राचीही तशीच गत आहे.

पश्चिम बंगालमध्ये या योजनेंतर्गत सर्वाधिक वेगाने कामे पूर्ण केली जात आहेत. तेथे कामे पूर्ण करण्याचा दर तब्बल ९१.७ टक्के आहे. ३४.६८ लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी ३३.३९ लाख घरे बांधण्यात आल्यामुळे तेथे ९१.७ टक्के लक्ष्य गाठले गेले आहे. 

महाराष्ट्राचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी

महाराष्ट्रात गरिबांसाठी पक्की घरे पूर्ण होण्याचा दर ६९ टक्के आहे, जो राष्ट्रीय सरासरी ७१ पेक्षाही थोडा कमीच आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (पीएमवायजी) अंतर्गत महाराष्ट्रात एकूण १३ लाखांहून अधिक ग्रामीण लाभार्थ्यांना पक्की घरे दिली जाणार आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ ८.९६ लाख (६८.९५ टक्के) घरे पूर्ण झाली आहेत.ग्रामीण बेघर लोकांना पक्की घरे देण्याची राष्ट्रीय सरासरी ७१.१ आहे. या योजनेंतर्गत देशभरातील २.७४ कोटी नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी २.०८ कोटी घरे पूर्ण झाली आहेत.

योगींचा उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी 

भाजपशासित उत्तर प्रदेश या आणखी एका मोठ्या राज्याने ९५ टक्के यश मिळवले आणि पश्चिम बंगालनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या १४ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील २७.२४ लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी २५.८८ लाख घरे पूर्ण झाली आहेत. गुजरातमध्ये या योजनेंतर्गत नोंदणीकृत ४.७२ लाखांपैकी ३.९८ लाख घरे बांधण्यात आली आहेत. पंजाब आणि हरयाणाने अनुक्रमे ६३.६५ टक्के आणि ७६.२२ टक्के लक्ष्य गाठले आहे. ही योजना २०१६मध्ये सुरू करण्यात आली आणि डिसेंबर २०२२पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल