शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal : अंतर्गत सर्वेक्षणात TMCचं नुकसान, भाजपला मिळतायत एवढ्या जागा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 4, 2021 18:59 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी 190 च्या जवळपास जागा जिंकू शकते, असे पक्षाच्या अतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. 016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागांवर विजय मिळवला होता.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि राज्यात आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात करत असलेल्या भाजपने आपापल्या विजयाचा दावा केला आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसने बंगालच्या जनतेची नस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी 190 च्या जवळपास जागा जिंकू शकते, असे पक्षाच्या अतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागांवर विजय मिळवला होता.

काय सांगते टीएमसीचे अतर्गत सर्वेक्षण -टीएमसीच्या अतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजपला 98 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला केवळ 6 जागांवरच समाधान मानावे लागणार असल्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 51 टक्क्यांपेक्षा थोडी अधिक मते मिळू शकतात.

भाजप या सर्वेक्षणाला गांभीर्याने घेताना दिसत नाही -टीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळच्या निवडणुकीत दार्जिलिंग, बीरभूम, मालदा, मुर्शिदाबाद, कूचबिहार, पश्चिम बर्धमान, नदिया आणि कोलकाता जिल्ह्यात टीएमसीच्या मतांमध्ये वाढ होऊ शकते. मात्र, भाजप या सर्वेक्षणाला गांभीर्याने घेताना दिसत नाही. टीएमसी नेते आणि राज्यसभा खासदार शांतनू सेन यांनी दावा केला आहे, की बंगालच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील लोक सरकारच्या कामावर खूश आहेत.

बंगालमध्ये 148 मॅजिकल फिगर -गत 2019च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता, भाजप विधानसभेच्या दृष्टीने 121 जागांवर पुढे होती. बंगालमध्ये 148 ही मॅजिकल फिगर आहे. भाजपच्या मोठ्या नेत्यांचे म्हणणे आहे, बंगालमधील वातावरण पाहता राज्यात भाजपच सरकार स्थापन करेल. याशिवाय टीएमसीचे छोटे-मोठे नेते सातत्याने भाजपमध्ये सामील होत आहेत. यामुळे भाजपचे बंगालमधील स्थान अधिक बळकट होत आहे.

"भाजप पश्चिम बंगाल विधानसभेत 155 ते 160 जागा जिंकेल" -भाजपच्या अनेक नेत्यांनी अंदाज व्यक्त केला आहे, की या वेळी भाजप पश्चिम बंगाल विधानसभेत 155 ते 160 जागा जिंकेल. यावेळी भाजपने बंगालची पाच झोनमध्ये विभागणी केली आहे. यात, उत्तर बंगाल झोनमध्ये 54 जागा असून पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप येथे 30 ते 35 जागा जिंकू शकतो. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाElectionनिवडणूक