शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला; 6 जण जखमी, एकाचा मृत्यू, TMC वर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 21:39 IST

west bengal : 'पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपली आहे.'

ठळक मुद्देनुकतेच भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. गुरुवारी जेपी नड्डा डायमंड हार्बरला जात असताना त्यांच्या ताफ्यावर दगडांनी हल्ला करण्यात आला.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यातील संघर्ष पेटला आहे. उत्तर 24 परगना येथील हलिशहरमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा करत हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीररित्या जखमी झाल्याचे भाजपाने म्हटले आहे.

भाजपाने यासंदर्भात ट्विट केले आहे. "आणखी एक दिवस, आणखी एक हत्या. हलिशहरमध्ये कार्यकर्ता सैकत भवाल यांची टीएमसीच्या गुंडांनी निर्घृण हत्या केली, तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना कल्याणीच्या जेएन मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पार्टीचे डोर टू डोर कॅम्पेन करत असताना सैकत भवाल यांच्यावर हल्ला झाला," असे ट्विट करण्यात आले आहे.

दुसरीकडे, ही घटना वैयक्तिक वैर असल्यामुळे घडल्याचे तृणमूल काँग्रेसने  केला आहे. तर भाजपा नेते मुकुल रॉय म्हणाले की, आरएसएस कार्यकर्ता आणि सहा नंबर वॉर्ड हलिशहरमध्ये  राहणारे सैकत भवाल यांची हत्या करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपली आहे.

दरम्यान, बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अजून बराच कालावधी असताना येथे राजकीय हिंसाचार सुरु झाला आहे. भाजपा आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसांत बर्‍याच वेळा संघर्ष झाला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना ठार मारण्यात येत असल्याचा दोन्ही पक्षांचा आरोप आहे. नुकतेच भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. गुरुवारी जेपी नड्डा डायमंड हार्बरला जात असताना त्यांच्या ताफ्यावर दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनाही दुखापत झाल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल