शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:15 IST

मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते...!

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. "भाजपने बाहेरील लोक बोलावून हिंसाचार घडवला. वक्फच्या मुद्यावरून लोकांना भडकवण्यात आले. मुर्शिदाबाद येथील हिंसाचार, हा सुनियोजित कट होता. घुसखोरांना का येऊ दिले गेले? मी I.N.D.I.A. ला या मुद्द्यावर संघटित येण्याचे आवाहन करते. याचा परिणाम सर्वांवरच होईल. आम्हाला शांतता हवी आहे," असे ममता बॅर्जी यांनी म्हटले आहे. त्या बुधवारी वक्फ कायद्याच्या मुद्द्यावर इमामांना संबोधित करत होते.

जोवर आम्ही आहोत तोवर हिंदू-मुस्लीम होऊ देणार नाही -ममता पुढे म्हणाल्या, "आम्ही हिंदू आणि मुसलमानांचे विभाजन होऊ देणार नाही. एका कुण्याचा एका प्रश्न नाही. वक्फवर नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू गप्प का आहेत. या लोकांना केवळ सत्तेची चिंता आहे. जोवर आम्ही आहोत तोवर हिंदू-मुस्लीम होऊ देणार नाही."

मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते - याच बरोबर, उत्तर प्रदेश आणि बिहारचे व्हिडिओ दाखवून पश्चिम बंगालला बदनाम केले जात आहे. खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. भाजप खेटे व्हिडिओ दाखवून बदनाम करत आहे. मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते.

सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी -"सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी आहे. जर तुम्हाला बंगालबद्दल बोलायचेच असेल, तर माझ्यासमोर बोला. मी सर्व इमाम आणि धर्मगुरूंचा आदर करतो. आम्ही रवींद्रनाथ टागोरांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतो. बंगालमध्ये हिंसाचार भडकवण्याच्या भाजपच्या कटात अडकू नका," असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसHinduहिंदूMuslimमुस्लीम