शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

Woman Stuck in Hospital Lift:सरकारी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये 4 दिवस अडकली महिला, असा वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 20:06 IST

Woman Stuck in Hospital Lift: महिला चार दिवस लिफ्टमध्ये अडकून होती. यादरम्यान तिने खूप आरडाओरड केला, पण कुणालाच तिचा आवाज ऐकू आला नाही.

कोलकाता: तुम्ही अनेकदा लिफ्टमध्ये व्यक्ती अडकल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. पण, कोलकातामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील नीलरतन हॉस्पिटल या सरकारी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये एक महिला तब्बल चार दिवस लिफ्टमध्ये अडकली होती. महिला लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती रुग्णालयातील कुणालाच लागली नाही. लिफ्टमध्ये अडकल्यानंतर महिलेने खूप आरडाओरडा केला, मात्र तिचा आवाज कोणीच ऐकला नाही. खूप प्रयत्न केल्यानंतरही कुणी त्या महिलेच्या मदतीला आले नाही, अखेर महिलेने जगण्याची कोणतीही आशा सोडली होती. पण, रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती नसल्याचे सांगितले आहे.

नेमकं काय घडलं ?मागच्या आठवड्यात सोमवारी(दि.24) 60 वर्षीय अनोयारा बीबी एनआरएस रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये डॉक्टरांना भेटण्यासाठी आल्या होत्या. डॉक्टरांची ओपीडी चौथ्या मजल्यावर असल्याने त्यांनी लिफ्टचा वापर केला. रुग्णालयात एक मोठी लिफ्ट आणि एक छोटी आहे. महिलेने छोट्या लिफ्टचा वापर केला. लिफ्ट सुरू झाली, पण दुसऱ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडली. सोमवार ते शुक्रवार असे सलग चार दिवस ती लिफ्टमध्येच अडकलेली होती. 

पाणी आणि चिवडा खाऊन भूक भागवलीबंगाली वृत्तपत्र गणशक्तीमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बदुदियाच्या चांदीपूर गावातील रहिवासी अनोयारा बीबीने सांगितले की, लिफ्टमध्ये अडकल्यानंतर ती खूप रडली, परंतु तिचा आवाज कोणीही ऐकला नाही. ती महिला म्हणाली, “माझ्याकडे पाण्याची बाटली आणि चिवड्याचे एक पॅकेट होते. रोज थोडासा चिवडा खाऊन आणि पाणी पिऊन दिवस काढत होते. 

अशाप्रकारे लिफ्टमधून बाहेर आली

चार दिवसानंतरही महिला घरी न पोहोचल्याने घरातील सदस्य तिचा शोध घेत बाहेर पडले. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले, पण ती सापडली नाही. त्यानंतर शुक्रवारी महिलेचा एक ओळखीचा व्यक्ती रुग्णालयात पोहोचला, तेव्हा त्याला लिफ्टमधून महिलेचा आवाज आला. काही वेळातच इतर लोकांना बोलावून महिलेला तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, चार दिवस अशा अंधारात असल्याने महिला चांगलीच घाबरली होती.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालhospitalहॉस्पिटल