शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 21:49 IST

तत्पूर्वी, कबीर यांनी १७ डिसेंबरला विधानसभेचा राजीनामा देण्याचा आणि २२ डिसेंबरला नवीन राजकीय पक्ष स्थापण करण्याचे संकेत दिले होते.

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी आपल्या भूमिकेसंदर्भात मोठा यू टर्न घेतला आहे. मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीसारख्या मशिदीचे भूमिपूजन केल्यानंतर आपण लवकरच राजीनामा देऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र दोन दिवसांतच त्यांनी आपली भूमिका बदलली. आता त्यांनी, विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते म्हणाले, “आता राजीनाम्याचा प्रश्नच नाही. आपल्या मतदारसंघातील लोकांनीच आपल्याला पदावर राहण्याची विनंती केली असून त्यांच्या इच्छेचा आदर म्हणून त्यांनी आपला निर्णय बदलला आहे."

कबीर यांच्यापासून अधिक अंतर ठेवण्याचा तृणमूल काँग्रेसचा निर्णय -तत्पूर्वी, कबीर यांनी १७ डिसेंबरला विधानसभेचा राजीनामा देण्याचा आणि २२ डिसेंबरला नवीन राजकीय पक्ष स्थापण करण्याचे संकेत दिले होते. दरम्यान आता तृणमूल काँग्रेसनेही कबीर यांच्यापासून अधिक अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा कक्षातील त्यांची जागा बदलून त्यांना भाजपच्या बाकांजवळ बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ट्रेजरी बेंचजवळील पहिल्या रांगेत देण्यात आली होती जागा -पूर्वी मंत्रीपदाचा दर्जा लाभल्याने कबीर यांना ट्रेजरी बेंचजवळील पहिल्या रांगेत जागा देण्यात आली होती. २०१२ मध्ये काँग्रेसमधून टीएमसीत प्रवेश करून त्यांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री म्हणून काम केले होते. मात्र २०१५ च्या पोटनिवडणुकीत पराभवानंतर त्यांना मंत्रिपद गमवावे लागले.

दरम्यान, मुर्शिदाबादच्या बेलडांगा येथे मशिदीच्या भूमीपूजनानंतर, राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Humayun Kabir's U-turn: No Resignation After Mosque Groundbreaking Ceremony

Web Summary : Trinamool Congress MLA Humayun Kabir reversed his decision to resign after promising to do so following a mosque groundbreaking. He cited requests from his constituents to remain in office. The TMC is distancing itself from Kabir, moving him to a seat near the BJP benches.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण