शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ममतांना पुन्हा धक्का? कॅबिनेटच्या बैठकीत राजीव बॅनर्जींसह चार मंत्री गैरहजर, भाजपत जाण्याच्या चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 23:01 IST

राजीव बॅनर्जी हे गेल्या काही दिवसांपासून बंडाच्या मार्गावर चालत आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी टीएमसीच्या हाय कमांडलाही निशाण्यावर घेतले होते.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकला TMCचे तब्बल चार मंत्री गैरहाजर राहिले.नुकतेच शुभेन्दु अधिकारी यांच्यासह टीएमसीचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. राजीव बॅनर्जी हे गेल्या काही दिवसांपासून बंडाच्या मार्गावर चालत आहेत.

कोलकाता :पश्चिम बंगालमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकला TMCचे तब्बल चार मंत्री गैरहाजर राहिले. यात राजीव बॅनर्जी, गौतम देव, रविंद्रनाथ घोष आणि चंद्रनाथ सिन्हा यांचा समावेश आहे. नुकतेच शुभेन्दु अधिकारी यांच्यासह टीएमसीचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नेत्यांच्या अनुपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. 

यासंदर्भात बोलताना तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चटर्जी म्हणाले, की या मंत्र्यांनी नक्कीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपण बैठकीला का उपस्थित राहू शकलो नाही, यासंदर्भात माहिती दिली असेल. मात्र, इतर नेत्यांच्या अनुपस्थितीसंदर्भात कसल्याही प्रकारची चर्चा नाही. पण, राजीव बॅनर्जी यांच्या न येण्याने, ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

राजीव बॅनर्जी हे गेल्या काही दिवसांपासून बंडाच्या मार्गावर चालत आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी टीएमसीच्या हाय कमांडलाही निशाण्यावर घेतले होते. यानंतर पार्थ चटर्जी आणि प्रशांत किशोर यांनीही राजीव बॅनर्जी यांच्यासोबत बैठक केली होती. पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही राजीव बॅनर्जी भाजपच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे.

 तृणमूलचे आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपत -गेल्या आठवड्यातच आजी-माजी खासदारांसह ११ आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत अमित शहंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.  यानंतर आता राजीव बॅनर्जींसह चार मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकिला अनुपस्थित असल्याने पुन्हा ममतांना धक्का बसतो की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपा