शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

West Bengal : सर्व Exit Polls मध्ये भाजप १०० पार; प्रशांत किशोरना शोधावं लागणार का नवं काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 22:19 IST

पश्चिम बंगालमध्ये भाजपला १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यास आपण हे काम सोडणार असल्याचा दावा त्यांनी केला होता.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये भाजपला १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यास आपण हे काम सोडणार असल्याचा दावा त्यांनी केला होता.सर्वच एक्झिट पोल्समध्ये भाजपला १०० पेक्षा अधिक जागा

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचं दिसून येत आहे. काही एक्झिट पोल्सने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसच्या हॅट्ट्रिकचा दावा केला आहे, तर काही एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होईल असा दावा केला आहे. परंतु या सर्वात प्रशांत किशोर यांच्याकडेही प्रामुख्यानं लक्ष जात आहे. एक्झिट पोलनुसार त्यांचा दावा चुकीचा ठरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांना नवं कामही शोधावं लागू शकतं. जर पश्चिम बंगालमध्ये भाजपनं १०० चा आकडा पार केला तर आपण आपलं काम सोडू असं जाहीररित्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांणध्ये तृणमूल काँग्रेससाठी रणनिती आखणाऱ्या प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा ट्विटरवर हा दावा केला होता तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी ते ट्विटर सोडणार असल्याचा दावा केला होता. परंतु नुकतंच प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी जर भाजपनं १०० चा आकडा गाठला तर आपण निवडणुकांची रणनिती आखण्याचं काम सोडणार असं म्हटल्याचं आजतकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. भाजपला पश्चिम बंगालच्या निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर आपण हे काम करण्यात काहीच अर्थ नसल्याचं म्हणाले. यापूर्वीही त्यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये हा दावा करण्यात आला होता. "मी जे काम करतो, ज्यामुळे तुम्ही माझ्याशी चर्ता करत आहात. मला रणनितीकार म्हणत आहा, कोणी आणखी काही म्हणतं, मी जे काही काम करत आहे ते करण्यात अर्थच राहणार नाही जर याठिकाणी भाजपला १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या," असं प्रशांत किशोर मुलाखतीदरम्यान म्हणाले होते.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीPrashant Kishoreप्रशांत किशोरPunjabपंजाबexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी