शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Alapan Bandyopadhyay : पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांना मोदी सरकारकडून नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 12:52 IST

Alapan Bandyopadhyay : आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केंद्राने नोटीस पाठविली असून अलपन बंडोपाध्याय यांना तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले. 

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळली. त्यांनी अलपन बंडोपाध्याय यांना आपला मुख्य सल्लागार बनविण्याची घोषणा केली.

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारचे माजी मुख्य सचिव आणि आयएएस अधिकारी असलेले अलपन बंडोपाध्याय (Alapan Bandyopadhyay) यांना पंतप्रधानांच्या नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित न राहिल्यामुळे केंद्र सरकारने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. अलपन बंडोपाध्याय सोमवारी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलपन बंडोपाध्याय यांनी तातडीने आपला मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली. (west bengal ex chief secretary alapan bandyopadhyay served show cause notice for skipping meet chaired by pm modi)

केंद्र सरकारने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या नोटीसमध्ये अलपन बंडोपाध्याय यांना बंगालमध्ये आलेल्या यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीतील अनुपस्थितीचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केंद्राने नोटीस पाठविली असून अलपन बंडोपाध्याय यांना तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले. 

(ममता बॅनर्जींची मोठी खेळी, अलपन बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती)

दरम्यान, केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील संघर्ष कमी होताना दिसत नाही. मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांच्या बदलीवरूनही वाद सुरू होता. यातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळली. त्यांनी अलपन बंडोपाध्याय यांना आपला मुख्य सल्लागार बनविण्याची घोषणा केली. त्याचबरोबर मुख्य सचिव पदाची जबाबदारी हरिकृष्ण द्विवेदी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

बंडोपाध्याय 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारीअलपन बंडोपाध्याय 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. अलपन बंडोपाध्याय नियमांचे पालन करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वारंवार कौतुक केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्राने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना रिलिव्ह करण्यास सांगितले होते. मात्र या आदेशानंतरही राज्य सरकारने त्यांना रिलिव्ह केले नव्हते.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी