शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी झाल्या जखमी अन् घटनेच्या साक्षीदाराला लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 17:43 IST

West Bengal Election 2021: ममता बॅनर्जींवर नंदिग्राममध्ये हल्ला; तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी नंदिग्राममध्ये आलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केला आहे. तर ममता बॅनर्जी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक करत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे. कथित हल्ल्यात जखमी झाल्याचा फायदा बॅनर्जींना होऊ शकतो, असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. ममता बॅनर्जींना जखमी झाल्याचा राजकीय फायदा किती होणार २ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात समजेल. पण एका व्यक्तीला मात्र ममता बॅनर्जी जखमी झाल्यानं 'लॉटरी'च लागली आहे.ममता बॅनर्जींची जखम भाजपला महागात पडणार?; शरद पवारांप्रमाणे 'गेम' फिरवणार?मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्यानं आपल्याला फायदा झाल्याचा दावा एका व्यक्तीनं केला आहे. बॅनर्जी जखमी झाल्या त्यावेळी निमाई मैती नावाची व्यक्ती तिथे उपस्थित होती. मैती यांनी संपूर्ण घटना पाहिली. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार मैती यांना ५ हजार रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना पाहिल्यानंतर नशीब बदलल्याचं मैती यांनी सांगितलं.रूग्णालयातून ममता बॅनर्जींनी जारी केला व्हिडीओ; म्हणाल्या, "आता व्हिलचेअरवरून प्रचार करणार"ममता बॅनर्जी जखमी होताच मी त्यांच्या मदतीला धावलो. त्यांना प्रथमोपचार दिले. त्यामुळेच मला लॉटरी लागली, असं मैती म्हणाले. दोन दिवसांपूर्वी (१० मार्च) ममता बॅनर्जी नंदिग्राममध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. 'जसजसे लोक पुढेपुढे होऊ लागले, ममता बॅनर्जी यांचा पाय दरवाज्याला आदळला आणि त्या जखमी झाल्या,' असं मैती यांनी सांगितलं."ममतांना पराभूत करणार, नंदिग्रामचा संग्राम मीच जिंकणार,’’ शुभेंदू अधिकारींचे प्रतिआव्हाननिमाई मैती यांचं मिठाईचं दुकाननंदिग्राममधल्या बेरुलिया बाजारात निमाई मैती यांचं मिठाईचं दुकान आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला होताच मैती रातोरात चर्चेत आले. आता मैती यांनी एक लॉटरीचं तिकीट जिंकलं आहे. ममता बॅनर्जींना केलेल्या मदतीमुळेच आपल्याला लॉटरी लागल्याची भावना मैतींनी व्यक्त केली.आता खर्च करणार नाही; नंतर मिठाई वाटणारलॉटरीतून जिंकलेल्या पैशाचा वापर न करण्याचा निर्णय मैती यांनी घेतला आहे. एखादं आवश्यक काम करण्यासाठी पैशाचा वापर करण्याचा विचार त्यांनी केला होता. मात्र आता है पैसे सांभाळून ठेवणार असल्याचं मैती यांनी सांगितलं. ममता बॅनर्जींना दुखापत झाल्यानंतर मी ती बर्फानं शेकवली. त्यानंतर माझं नशीबच बदललं. आता निवडणूक जिंकल्यावर याच पैशानं मिठाई वाटेन, असं मैती म्हणाले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१