शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अतूट नातं! कोरोनात पत्नी गमावली, बनवला सिलिकॉनचा पुतळा; आता रोज मारतात गप्पा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 17:49 IST

तपस यांचे पत्नीवरील प्रेम आणि इंद्राणी यांचा पुतळा हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

कोलकाता येथील 65 वर्षीय तपस शांडिल्य यांनी त्यांच्या दिवंगत पत्नीचा सिलिकॉनचा पुतळा बनवला आहे. त्यांची पत्नी इंद्राणी यांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. यानंतर तपस यांनी पत्नीचा पुतळा बनवण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च केले. तपस आपल्या पत्नीप्रमाणे या पुतळ्याची काळजी घेतात. दररोज ते तिला कपडे घालतात, सोन्याचे दागिने घालतात आणि तिच्याशी बोलतात, गप्पा मारतात. 

तपस यांचे पत्नीवरील प्रेम आणि इंद्राणी यांचा पुतळा हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. कैखली भागात राहणारे तपस सिंह हे निवृत्त केंद्रीय कर्मचारी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सुमारे दहा वर्षांपूर्वी पत्नीसह मायापूरमधील इस्कॉन मंदिरात गेले होते. येथे दोघांनीही ए. सी. भक्तिवेदांत स्वामींची मूर्ती पाहिली, ज्यांनी त्यांना खूप प्रभावित केले. त्यामुळेच इंद्राणी यांनी तपस यांना सांगितले की, जर मी मेले तर तुम्ही माझ्यासारखाच पुतळा करून घ्या.

इंद्राणी यांनी हे गमतीने सांगितलं होतं पण तपस यांनी हे खरं केलं. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत इंद्राणी यांना संसर्ग झाला, त्यानंतर 4 मे 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला. तपस यांनी आपल्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी सिलिकॉनचा पुतळा बनवणाऱ्या लोकांबद्दल इंटरनेटवर सर्च केलं. त्यांनी आपल्या पत्नीचा पुतळा बनवण्याची जबाबदारी शिल्पकार सुबीमल दास यांच्यावर सोपवली. इंद्राणीची मूर्ती बनवण्यासाठी सुबीमल यांनी तपस यांच्याकडे पत्नीचे फोटो मागितले. 

सुबीमल सांगतात की, सर्वप्रथम त्यांनी मातीचे मॉडेल बनवले, नंतर फायबर मोल्डिंग आणि सिलिकॉन कास्टिंग केले. या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी आणि अडीच लाख रुपये खर्च झाले. आता तपस यांच्या घरी येणार्‍या सर्वांनाच असं वाटत नाही की इंद्राणी आता त्यांच्यासोबत आहेत. या पुतळ्याचे वजन 30 किलो आहे, तपस पुतळ्याला पत्नीप्रमाणे सोन्याचे दागिने घालतात. सुरुवातीला माझे अनेक नातेवाईक या निर्णयाच्या विरोधात होते. मात्र, नंतर सर्वच माझ्या आग्रहापुढे झुकले असं तपस यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या