शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा मध्य प्रदेश इतका मोठा कसा? कपालभाती करून दाखवा, 10 हजार रुपये देईन - ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:11 IST

Mamata Banerjee : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी पक्ष कार्यकर्त्याशी त्याचे वजन आणि तब्येत याविषयी बोलताना दिसत आहेत.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये त्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याशी गमतीशीर बोलत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या पक्ष कार्यकर्त्याशी त्याचे वजन आणि तब्येत याविषयी बोलताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता निवेदन देताना दिसत आहे. मग ममता बॅनर्जी त्यांना थांबवतात आणि म्हणतात, 'तुमचे पोट ज्या प्रकारे वाढत आहे, तुम्ही कधीही पडू शकता. तुमची तब्येत ठीक आहे का?' यानंतर पक्षाचा कार्यकर्ता सांगतो की, मला कोणताही आजार नाही, मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तसेच, मला  ना मधुमेह आहे, ना रक्तदाब आहे, असे म्हणत कार्यकर्ता ममता बॅनर्जींना आपला दिनक्रम सांगतो. 

यानंतर, ममता बॅनर्जी पुन्हा कार्यकर्त्याला गमतीशीरपणे म्हणतात, 'कोणती ना कोणती तरी समस्या आहे. तुमचा एवढा मोठा 'मध्य प्रदेश' कसा असू शकतो?' त्याला उत्तर देताना कार्यकर्ता म्हणतो की,  मी रोज सकाळी पकोडे खातो, त्यामुळेच माझे पोट खूप वाढले आहे. तसेच, ममता बॅनर्जी कार्यकर्त्याला विचारतात की, रोज व्यायाम करता की नाही? यावर त्याने सांगितले की, तो रोज 1000 कपालभाती प्राणायाम करतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही.

1000 कपालभाती करण्याचे दिलेआव्हान यावर ममता बॅनर्जी म्हणतात की, हे शक्य नाही. जर तुम्ही मला 1000 कपालभाती करून दाखवविला तर मी आता 10 हजार रुपये देईन. आपल्याला श्वास कसा घ्यायचा आणि बाहेर कसा घ्यावा हे देखील माहित नाही. ममता आणि पक्ष कार्यकर्त्याच्या या संवादावर सभेत बसलेले इतर कार्यकर्ते हसताना दिसत आहेत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSocial Viralसोशल व्हायरल