शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

...तर कोलकातामधील 'त्या' डॉक्टर हत्येचा तपास आता 'सीबीआय'कडे- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 13:46 IST

सलग चौथ्या दिवशीही कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरवर करण्यात आलेला बलात्कार व हत्या प्रकरणाचा छडा येत्या रविवारपर्यंत पोलिसांनी न लावल्यास या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली. या हत्येची न्यायालयीन चौकशी करावी, या मागणीसाठी कनिष्ठ डॉक्टर, इंटर्न आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींनी सलग चौथ्या दिवशी, सोमवारी काम बंद आंदोलन सुरू ठेवले असून, राज्यभरातील रुग्णालय सेवा विस्कळीत झाली आहे.

घटना घडलेल्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगाल सरकारने वैद्यकीय अधीक्षक तसेच उपप्राचार्य संजय वशिष्ठ यांना त्या पदावरून हटविले. या प्रकरणी शनिवारी एका संशयिताला अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

खटला जलदगती न्यायालयात

  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत. 
  • या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येईल. महिला डॉक्टर प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचे एक पथक कोलकात्यात आले असून ते पोलीस अधिकारी व डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सर्व माहिती जाणून घेणार आहे. 
  • या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करणाऱ्या तीन जनहित याचिका कोलकाता उच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या आहेत.

दिल्लीतही आंदोलन

  • कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील १० सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांनीदेखील सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. 
  • त्यामुळे दिल्लीतील वैद्यकीय सेवांवर परिणाम झाला आहे. महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणात न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीdoctorडॉक्टरDeathमृत्यूStrikeसंप