शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

West Bengal Civic Polls : तुफान राडा! मतदानावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 14:42 IST

West Bengal Civic Polls : काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आज मतदानावेळी हाणामारी झाली आहे. येथील प्रभाग नऊमध्ये दोन ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये 108 नगरपालिकांच्या 2 हजार 171 प्रभागांसाठी मतदान सुरू आहे. याच दरम्यान उत्तर 24 परगानामध्ये मतदानावेळी तृणमूल आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. भाजपा नेते अर्जुन सिंह यांनी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आज मतदानावेळी हाणामारी झाली आहे. येथील प्रभाग नऊमध्ये दोन ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली आहे. राज्यभर अशीच परिस्थिती आहे. पोलीस भाजपा कार्यकर्त्यांना अटक करत आहेत. त्यांना मतदान करू दिले जात नाही अशी माहिती दिली आहे.

"येथे फक्त पोलीस आणि गुंडच मतदान करत आहेत. मतदार मतदान करण्यास घाबरत आहेत, विशेषत: बंगाली लोकसंख्या, ज्यांना मतदान करू दिले जात नाही. मुस्लिमांनाही मतदान करता येत नाही. येथील पोलीस गांधीजींच्या तीन माकडांपैकी एकाची भूमिका निभावत आहेत" असं पश्चिम बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी म्हटलं आहे. अशा तुरळक घटना घडूनही मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 2171 प्रभागात 33.52 टक्के मतदान झाले आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही तुरळक घटना वगळता, आतापर्यंत मतदान शांततेत पार पडल्याचं म्हटलं आहे. हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही. काही भागांतून मतदानात अडथळे येत असल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावर आम्ही कारवाई केली असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. टीएमसीने भाजप नेत्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

अनेक बूथबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. सकाळपासूनच लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी पोहोचले. या निवडणुकीत सुमारे 95.6 लाख मतदार 8,160 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची स्पर्धा अनेकांशी आहे. तिकिटांच्या कमतरतेमुळे टीएमसीचे अनेक नेते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाtmcठाणे महापालिका