शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचे कार्यालय पाडले, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 16:32 IST

यामुळे भाजप आणि तृणुमूल काँग्रेसमधला संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो.

BJP Office Demolished : लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकातासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिक्रमणाविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या अंतर्गत कोलकाता येथे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) कार्यालय पाडण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये  बाचाबाची झाली.

फूटपाथवरील दुकानेही हटविण्यात आलीमिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील गोरागाचा, तरातळा येथील भाजपच्या कार्यालय पाडण्यात आले. याशिवाय, पश्चिम बंगाल पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत फूटपाथवर उभारलेली हजारो दुकानेही हटवली आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (27 जून 2024) फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून चालवलेल्या मोहिमेबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कोलकाता आणि सॉल्ट लेकमध्ये फूडस्टॉल, कपडे आणि विविध उत्पादने विकणाऱ्या फेरीवाल्यांना मंगळवारी (25 जून) हटण्यास सांगितले होते. तसेच, कोलकाता पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून जेसीबी मशिनच्या सहाय्याने भवानीपूर भागातील सरकारी एसएसकेएम रुग्णालयासमोरील फूटपाथ, हातीबागन आणि गरियाहाट भागातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. सध्या राज्यात अनेक ठिकाणी अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र झाली आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीEnchroachmentअतिक्रमणBJPभाजपाtmcठाणे महापालिका