शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये उर्वरित मतदान वेळेनुसारच; एकाच टप्प्यात घेण्याची मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:47 IST

West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माेठ्या प्रचार सभा आणि दिग्गज नेत्यांचे राेड शाे झाले. आता राज्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार हाेतांना दिसत आहे.

काेलकाता : काेराेनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेउन पश्चिम बंगालमध्ये एकाच टप्प्यात उर्वरित मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयाेगाने फेटाळली आहे. यासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आयाेगाने सर्वांची भूमिका जाणून घेतल्यानंतर निर्णय घेतला. तसेच सायंकाळी ७ वाजेनंतर काेणत्याही प्रकारे प्रचारास बंदी घातली आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माेठ्या प्रचार सभा आणि दिग्गज नेत्यांचे राेड शाे झाले. आता राज्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार हाेतांना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये १ ते १४ एप्रिल या कालावधीत तब्बल ४२० टक्क्यांनी काेराेनाची रुग्णसंख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काेलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्वपक्षीय बैठक बाेलाविली हाेती. तृणमूल काॅंग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकाच टप्प्यात मतदान घेण्याची आग्रही भूमिका मांडली हाेती.

काेराेना महामारी नियंत्रणात आणणे सर्वात महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत राजकारण दुय्यम आहे, असे मत तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी मांडले.  भाजपने लाेकशाही आणि सुरक्षेत संतुलन साधण्याचे निवडणूक आयाेगाला सुचविले हाेते.  एकाच टप्प्यात मतदान घेण्यास भाजपने विराेध केला हाेता. हीच भूमिका डाव्या पक्षांनीही घेतली. निवडणूकीचा कार्यक्रम नियाेजित वेळेनुसार झाला पाहिजे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता त्यात बदल करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका माकपचे खासदार बिकाश भट्टाचार्य यांनी मांडली. मात्र, सर्वपक्षीय बैठकीत तृणमूल काॅंग्रेस पक्ष एकटा पडला. 

काय म्हटले आयाेगाने-    निवडणूक आयाेगाने वाढत्या रुग्णसंख्येची दखल घेउन सर्व उमेदवार, स्टार प्रचारक तसेच राजकीय नेत्यांना काेराेनाच्या नियमावलीचे पालन करुन आदर्श घालून दाखविण्याचे आवाहन केले.-    आयाेगाने उर्वरित टप्प्यांच्या मतदानाच्या प्रचारासाठी वेळेची बंधने आणखी कडक केली आहेत. मतदानाच्या ७२ तास आधी प्रचार संपणार असून सायंकाळी ७ वाजेनंतर काेणत्याही प्रकारे प्रचारास बंदी घालण्यात आली आहे. -    प्रचार सभा, रॅली, राेड शाे इत्यादींवर सायंकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत निर्बंध घातले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदान हाेणार आहे. त्यापैकी ४ टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्याचे मतदान आज हाेत आहे. तर उर्वरित तीन टप्प्यांसाठी ही बंधने घालण्यात आली आहेत.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग