शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नंदिग्राममध्ये ममता-शुभेंदू अधिकारी यांच्यात रणसंग्राम, भाजपनं जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 20:17 IST

यापूर्वी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसने 291 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. याच बरबोर काँग्रेस, लेफ्ट आणि आयएसएफ आघाडीनेही 60 जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. (West bengal assembly election - 2021)

नवी दिल्ली - भाजपने (BJP) पश्चिम बंगाल विधानभा निवडणुकीसाठी (West Bengal Election) शनिवार (6 मार्च) पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याकरिता एकूण 57 उमेदवारांची यादी जाहीर केली. महत्वाचे म्हणजे नंदीग्राममधून शुभेंदू अधिकारी यांना तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे आता येथे ममता आणि शुभेंदू अधिकारी (Mamata Banerjee vs Suvendu Adhikari) यांच्यात थेट सामना रंगणार आहे. (West bengal assembly election bjp candidate list decleard Mamata Banerjee vs Suvendu Adhikari in Nandigram)भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. अरुण सिंह म्हणाले, केंद्रीय सूचना समितीने 57 जागांसाठी उमेदवारांच्या नावावर मोहर लावली आहे. नंदीग्राममधून शुभेंदू अधिकारी यांना तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे शुबेंदू आता नंदीग्राम येथून ममतांविरोधात निवडणूक लढतील हे निश्चित झाले आहे. याच बरोबर क्रिकेटर अशोक डिंडालाही तिकीट देण्यात आले आहे.

ममतांना जबर धक्का, TMC मध्ये उभी फूट! तब्बल 10 आमदारांसह तीन खासदार भाजपच्या संपर्कात?

"मतदानाच्या दिवशी करा फक्त 'एवढंच' काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा...!; गडकरींचा हल्लाबोलयापूर्वी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसने 291 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. याच बरबोर काँग्रेस, लेफ्ट आणि आयएसएफ आघाडीनेही 60 जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.ममता आणि अधिकारी या दोघांसाठीही हा बालेकिल्ला -पश्चिम बंगालमधील नंदीग्राम हा शुभेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो. पर्यायाने, ते तृणमूलमध्ये असताना हा तृणमूलचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जात होता. मात्र, आता शुभेंदू अधिकारी यांनी भाजपचा भगवा हाती घेतल्याने, ममतांसमोब हा बालेकिक्ला वाचविण्याचे मोठे आव्हाण आहे. यामुळेच त्यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी हाच मतदारसंघ निवडला आहे. त्यामुळे आता या तृणमूलच्या बालेकिल्ल्यात शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट रणसंग्राम होणार आहे. या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

'बंगालमध्ये हिंसाचाराने जनता त्रस्त, आता होतेय खरे परिवर्तन', भाजपत प्रवेश करताच त्रिवेदींचा ममतांवर हल्लाबोलगालमध्ये कुठल्या टप्प्यात किती जागांसाठी मतदान -पश्चिम बंगालमधील 294 पैकी 30 जागांवर 27 मार्चला पहिल्या टप्प्यात मतदान होईल, दुसऱ्या टप्प्यात 30 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 31 जागांसाठी, 6 एप्रिलला चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी 10 एप्रिलला पाचव्या टप्प्यात 45 जागांसाठी 17 एप्रिलला, सहाव्या टप्प्यात 43 जागांसाठी 22 एप्रिलला, सातव्या टप्प्यात 36 जागांसाठी 26 एप्रिलला तर आठव्या टप्प्यात 35 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होईल. तर निकाल 2 मेरोजी लागणार आहे.

 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी