शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 14:05 IST

उत्तर प्रदेशातील एका पोलिस ठाण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक वयस्क व्यक्ती अचानक कोसळल्याचे दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका पोलिस ठाण्यात एका वयस्क व्यक्तीचे पोलिसांच्या तत्परतेमुळे प्राण वाचले आहे. वेळीच पोलिसांनी त्या व्यक्तीला सीपीआर दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका वृद्धाचे प्राण तेथे उपस्थित असलेल्या दोन पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचवल्याचे दिसत आहे. वृद्धाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच कोसळले. कोणाला काही समजण्याआधीच टेबलच्या पलीकडून आसलेल्या पोलिसांनी त्यांना सीपीआर द्यायला सुरुवात केली. सुमारे एक मिनिट या वृद्धाला सीपीआर देण्यात आला. वृद्धाचा जीव वाचला. 

अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 

पोलीस ठाण्यात सीपीआर देण्याची ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि व्हॉट्सॲपवर शेअर केला आहे. रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन वृद्ध आग्राच्या जीआरपी पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी कॉन्स्टेबल राकेश कुमार आणि कॉन्स्टेबल रवेंद्र चौधरी हे ड्युटीवर होते. त्या वृद्धाचा मोबाईल कुठेतरी पडल्याचे वृद्धाने सांगितले.वृद्धाने तक्रार लिहून दिली. त्यांना रिसिव्हिंग देण्यासाठी कॉन्स्टेबल रवेंद्र चौधरी रिपोर्ट दाखल करत होते. यादरम्यान तो व्यक्ती अचानक खाली पडला.

हवालदार रवेंद्र आणि राकेश यांनी वृद्ध व्यक्तीला जमिनीवर पडताना पाहिल्यानंतर दोघेही काही काळ स्तब्ध झाले. पण वृध्दाला हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांना समजले, वेळ न दवडता त्यांनी ताबडतोब सीपीआर देण्यास सुरुवात केली. सुमारे एक मिनिट या वृद्धाला सीपीआर देण्यात आला. वृद्ध व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्तीही यावेळी मदतीसाठी हतबल दिसत आहे. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला पाण्याची बाटली दिली आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. १ मिनिट ३८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हा वृद्धाची तब्येत सुधरल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेश