शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसह नूडल्स खाण्यास गेला, गो तस्कर समजून गोळ्या झाडल्या; पाच गोरक्षकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 10:04 IST

Haryana Crime News: गो तस्कर समजून पाच गोरक्षकांच्या गटाने १२वीच्या विद्यार्थ्याचा कारमध्ये पाठलाग करत त्याला गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी सौरभ, अनिल कौशिक, वरुण, कृष्णा आणि आदेश या पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

फरिदाबाद - गो तस्कर समजून पाच गोरक्षकांच्या गटाने १२वीच्या विद्यार्थ्याचा कारमध्ये पाठलाग करत त्याला गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी सौरभ, अनिल कौशिक, वरुण, कृष्णा आणि आदेश या पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.

२३ ऑगस्टच्या रात्री आरोपींनी विद्यार्थी आर्यन मिश्रा आणि त्याचे मित्र शांकी आणि हर्षित यांना गो तस्कर समजले आणि दिल्ली-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ३० किलोमीटरपर्यंत त्यांच्या कारचा पाठलाग केला. जेव्हा आर्यनला कार थांबवण्यास सांगितले तेव्हा त्याने कारचा वेग वाढवला, त्यानंतर आरोपींनी टोलनाक्यावर त्यांच्यावर गोळीबार केला. यात आर्यनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कार आणि अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

गोरक्षकांच्या गाडीवर पोलिसांसारखे दिवेआर्यन मिश्रा रात्री ११ वाजता मित्र शांकी आणि हर्षित, त्यांची आई श्वेता गुलाटी आणि दोन महिलांसोबत वर्धमान मॉलमध्ये नूडल्स खाण्यासाठी गेले होते. मात्र, नूडल्स खाऊन परतत असताना गोरक्षकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. गोरक्षकांच्या गाडीवर पोलिसांसारखे दिवे होते. ते पाहून आर्यन घाबरला आणि त्याने कारचा वेग वाढविला. यावेळी गोरक्षकांनी त्याच्यावर गोळीबार केला. कार थांबल्यावर आर्यनवर पुन्हा एकदा आरोपींनी गोळी झाडली. मात्र, गाडीतील महिलांना पाहून आपण चुकीच्या लोकांच्या मागे लागल्याचे गोरक्षकांना वाटल्याने त्यांनी पळ काढला.

काँग्रेसची टीका- हरयाणातील भाजप सरकारचे १० वर्षांचे हे रिपोर्ट कार्ड आहे. येथे दिवसाढवळ्या रस्त्यावर लोकांची हत्या केली जात आहे.-येथे गुन्हेगार निर्भयपणे फिरत आहेत. त्यांच्या मनात कायद्याची भीतीन नाही.-भाजपच्या डबल इंजिन सरकारने हरयाणाला ‘क्राइम कॅपिटल’ बनवून सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

वडील म्हणाले, त्यांना  अधिकार कुणी दिला? - माझ्या मुलाला गो तस्कर समजून गोळ्या घालण्यात आल्या. गाय तस्करीच्या संशयावरून एखाद्याला गोळ्या घालण्याचा अधिकार या गोरक्षकांना कुणी दिला आहे?- तो अधिकार दिला असेल तर का दिला आहे? आम्ही पंडित आहोत. कोणाशीही वाद नव्हता, असे आर्यनचे वडील सियानंद मिश्रा यांनी म्हटले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणा