शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नीट, जेईई स्थगित करा; दिल्लीत ‘एनएसयूआय’चे बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 01:18 IST

कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करीत बुधवारी भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शास्त्री भवननजीक निदर्शने केली.

नवी दिल्ली : नीट, जेईई परीक्षा स्थगित करावी आणि कोरोना साथीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचे शुल्क माफ करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने (एनएसयूआय) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करण्याची मागणी करीत बुधवारी दिल्लीत शास्त्री भवननजीक निदर्शने केली.

काँग्रेसशी संलग्न असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियाचे (एनएसयूआय) अध्यक्ष नीरज कुंदन आणि दिल्ली शाखेच्या अध्यक्षांनी अन्य आठ सदस्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोविड-१९ च्या साथीदरम्यान विद्यापीठांनी परीक्षा घेऊ नयेत, अशीही त्यांची मागणी आहे. नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करावी आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या कामगिरीच्या आधारे बढती देण्यात यावी, अशी मागणी एनएसयूआयने मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली होती.कोरोना साथीमुळे विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेऊन राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करण्याची विनंती सरकारला केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला नीट आणि जेईई परीक्षा रद्द करण्याचे आवाहन केले आहे.युवक काँग्रेसची निदर्शने...कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करीत बुधवारी भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शास्त्री भवननजीक निदर्शने केली. निवेदन देण्यासाठी शास्त्री भवनातील शिक्षण मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेले, असे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रसिद्धी सल्लागार राहुल राव यांनी सांगितले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थ्यांचे हित आणि सुरक्षेचा विचार करून केंद्र सरकारने परीक्षा स्थगित करावी. परीक्षा घेणे आवश्यक आहे; परंतु लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेतली जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :examपरीक्षा