शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात या, पण रस्त्यावर लघवी करू नका- मनोहर पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 08:25 IST

हे पर्यटक म्हणजे 'पृथ्वीवरची घाण' आहेत, असे त्यांनी म्हटले होते.

गोवा: कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी गोव्यात येणाऱ्या उत्तर भारतीय पर्यटकांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी म्हटले की, भारतातील लोकांनी पर्यटनासाठी गोव्यात जरुर यावे. मात्र, यावेळी त्यांनी काही गोष्टींचे भान बाळगणे गरजेचे आहे. पर्यटकांनी रस्त्यावर लघवी करू नये, कुठेही कचरा टाकू नये असे अपेक्षित आहे. केवळ पर्यटकच नव्हे तर स्थानिकांनी देखील रस्त्यावर कचरा टाकू नये, असे अपेक्षित असतेच व आहे, असे पर्रीकर  म्हणाले.काही दिवसांपूर्वी मिरामार-दोनापॉल मार्गावर एक पर्यटक बसमधून लघुशंका करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांना धारेवर धरले होते. हे पर्यटक म्हणजे 'पृथ्वीवरची घाण' आहेत, असे त्यांनी म्हटले होते. सरदेसाई यांच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांनी सरकारची भूमिका मांडली. सरदेसाई यांना पर्यटकांविषयी जे काही म्हणायचे होते, त्यामागील हेतू योग्य असावा. फक्त त्यांनी वापरलेली भाषा कठोर होती. त्यामुळे त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मात्र, सरदेसाई यांनी स्वत:हून त्याविषयी दिलगिरी व्यक्त केल्याचे पर्रीकर यांनी म्हटले. तसेच सध्या गोव्यात ज्या साधनसुविधा आहेत, त्या पाहता पन्नास ते साठ लाख पर्यटकांचा भार गोवा पेलू शकतो. मात्र तिसरा मांडवी पुल, नवा जुवारी पुल, पत्रदेवी ते पोळे महामार्ग अशा अनेक साधनसुविधा उभ्या राहिल्यानंतर दीड कोटी पर्यटकांना गोवा सामावून घेऊ शकेल. पर्यटन व्यवसायाचा विस्तार व्हायला हवा. तो अंतर्गत भागांमध्ये विस्तारायला हवा. एका खनिज व्यवसायावर आम्ही अवलंबून राहू शकत नाही आणि केवळ पर्यटनावरच सुद्धा अवलंबून राहू शकत नाही, असेही पर्रीकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरtourismपर्यटन