शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : तुझं आगमन...अनमोल म्हणावं! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्र १० जूनला सुखावणार
2
पीएला अटक केल्यानंतर शशी थरूर यांना बसला धक्का; सोशल मीडियाद्वारे दिली प्रतिक्रिया 
3
उन्हाच्या झळा, भक्तांची गर्दी थांबेना; एक लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, नियमही बदलले! 
4
कौतुकास्पद! दिवसा अभ्यास अन् रात्री हॉटेलमध्ये काम; गौरवने दहावीत मिळवले ९७ टक्के
5
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले...
6
वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...
7
PM मोदी आजपासून विवेकानंद रॉकवर, ४५ तासांचं ध्यान; समुद्र किनाऱ्यावर लोकांची एन्ट्री बॅन, असा असेल कार्यक्रम
8
“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक
9
Mazagon Dock Share Price : ₹१४५ वर आलेला शिपिंग कंपनीचा IPO, ४ वर्षांपेक्षा कमी काळात शेअर पोहोचला ₹३४९९ पार
10
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
11
लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं?
12
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
13
“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
14
Health Insurance: हेल्थ इन्शुरन्स असेल तर क्लेम सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागणार नाही, ३ तासांत होणार काम
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली
16
'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?
17
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
18
प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन
19
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
20
यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review

वेलकम 2023..., देशभर मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 6:10 AM

ठिकठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून आला.

मुंबई : राज्यासह देशभरातील नागरिकांनी सरत्या २०२२ ला निरोप देत २०२३ चं जल्लोषात स्वागत केलं आहे. ठिकठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून आला. मुंबई, पुणे, बंगळुरु, गोवा आणि दिल्लीमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. आकर्षक रोषणाईत न्हाऊन निघालेल्या मुंबईतील पर्यटनस्थळांच्या परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीत वर्षांरंभाचा जल्लोष करण्यात आला. अनेक मुंबईकरांनी शहरातल्या नेहमीच्या गजबजाटापासून दूर पर्यटनस्थळी जाऊन नववर्षांचे स्वागत केलं. मुंबईत अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. मुंबई पोलीस दलाकडून नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमात अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नवी दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये लोक मोठ्या संख्येनं नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमा झाले होते. गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्यानं दिल्ली पोलिसांना गर्दी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. उत्तराखंडच्या मसुरीमध्ये रोषणाई, संगीत आणि नृत्याच्या तालावर तरुणाईनं स्वागत केलं. कोच्चीच्या फोर्टमध्ये नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या लोक जमले होते. तसेच, येथील कोचीन कार्निवलमध्ये मोठ्या संख्येन लोक जमा झाले होते. हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी नागरिकांनी स्वागत केलं. गोवा आणि मनालीमध्ये लोक आणि पर्यटक मोठ्या संख्येनं जमले होते. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्येही मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

पुणे शहर आणि उपनगरांमधील रस्त्यांवर नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली. शहरातील रस्त्यांवर रंगेबेरंगी फुगे, लाइट लावण्यात आले होते. फटाक्यांची आतिषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आलं. दुसरीकडे, लोणावळा, अलिबागसह रायगड आणि पालघरमधील समुद्र किनारे, महाबळेश्वर, पाचगणी आदी ठिकाणी ठाणेकर आणि मुंबईकरांची कुटुंबे शुक्रवारीच दाखल झाली होती. तर काही नोकरदारांनी शनिवारी कुटुंबासह पर्यटन स्थळांकडे कूच केल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र होतं. या पर्यटनस्थळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सरत्या वर्षांला निरोप दिला आणि रात्री उत्फुल्ल उत्साहात नव्या वर्षांचे स्वागत केलं.

जगभरात जल्लोषात स्वागतजगभरात अनेक देशांमध्ये मोठ्या जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. लोकांनी नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. ऑस्ट्रेलियाला 'लँड डाउन अंडर' म्हणून ओळखले जाते. येथेही फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सिडनी हार्बरभोवती प्रेक्षकांची गर्दी जमली होती. सिडनी ऑपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिजवर फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले. तर न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. ऑकलंडमधील स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. ऑकलंडमधील स्काय टॉवरच्या खाली लोक जमले जेथे 2023 चे स्वागत करण्यासाठी फटाके पेटवले जात आहेत. ही कामगिरी मध्यरात्री 10 सेकंद आधी सुरू होते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

 

टॅग्स :New Yearनववर्ष