शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एक विवाह ऐसा भी! ना बँड, बाजा, वरात... थेट हॉस्पिटलच्या बेडवरच लग्न झालं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 16:01 IST

हॉस्पिटलमध्ये बेडवर लग्न झाल्याची अजब घटना आता समोर आली आहे.

बिहारच्या अरवलमध्ये एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. मंदिरात लग्न होताना पाहिलं असेल, कोर्टात लग्न होताना पाहिलं असेल, पंचायतीत लग्न होताना तुम्ही पाहिलं असेल, पण आता हॉस्पिटलमध्ये बेडवर लग्न झाल्याची अजब घटना आता समोर आली आहे. अरवल जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. जिथे हॉस्पिटलच्या बेडवर तरुण आणि तरुणीचं लग्न झालं. 

एकमेकांना हार घातले. या अनोख्या लग्नसमारंभात हॉस्पिटलमधील कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते. एवढेच नाही तर हॉस्पिटलमधील रुग्णांनी आनंद साजरा केला. या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीरज कुमार असं तरुणाचं नाव असून हा दौलतपूरची रहिवासी असलेली त्याची मैत्रीण कौशल्या कुमारीला बाइकवरून बैदराबाद बाजारात फिरायला घेऊन गेला होता. 

कार आणि बाईकची त्यावेळी जोरदार धडक झाली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले, त्यानंतर दोघांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर मुलीचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मुलगा आणि मुलीची स्थिती पाहता प्रथम दोघांवर उपचार करण्यात आले. नंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तरुण-तरुणी एकमेकांवर प्रेम करायचे आणि घरच्यांना न सांगता गुपचूप भेटायचे. दोघेही बुधवारी सायंकाळी उशीरा बाईकवरून घरी परतत असताना अचानक कार आणि बाईकची धडक झाली ज्यात दोघे जखमी झाले. उपचारादरम्यान दोघांच्या कुटुंबीयांना प्रेमकहाणी कळली. मुलीच्या नातेवाईकांनी मुलावर दबाव आणला, त्यानंतर नातेवाईकांनी दोघांचेही रुग्णालयातच लग्न लावून दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न