शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाने वर्षात घेतले २,२७० बळी; देशभरात वीज पडून सर्वाधिक १५८० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 05:37 IST

१९०१ नंतर २०२२ हे पाचवे सर्वांत अधिक तापमान असलेले वर्ष राहिले. सरासरी १०८ टक्के पाऊस झाला.

नवी दिल्ली : देशात गतवर्षी हवामान फारसे चांगले राहिले नाही. या काळात तापमानही वाढले आणि नंतर पाऊसही खूप झाला. या वर्षात हवामान बदलाच्या तडाख्यात २,२७० जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक १५८० लोकांचा मृत्यू वीज पडल्यामुळे झाला.

१९०१ नंतर २०२२ हे पाचवे सर्वांत अधिक तापमान असलेले वर्ष राहिले. सरासरी १०८ टक्के पाऊस झाला. सरासरी पावसात कर्नाटकनंतर राजस्थान देशात दुसऱ्या क्रमांकावर होते. येथे सरासरीच्या १३६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जीवित व वित्त हानीही मोठ्या प्रमाणावर झाली.

हवामान विभागाच्या पुणे स्थित क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस सेंटरच्या अहवालात हा खुलासा झाला आहे. या विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी हा अहवाल जारी केला आहे. या अहवालात हवामान बदलामुळे झालेल्या जीवित व वित्त हानीची माहितीही आहे.केंद्र सरकारच्या राज्यवार वार्षिक हवामान बाबतच्या २०२२ च्या अहवालानुसार देशात या वर्षात मोठा पाऊस, पूर आणि कडकडाटासह वीज पडणे यासारख्या घटना घडल्या. सर्वाधिक ५८९ लोकांचा मृत्यू उत्तर प्रदेशात झाला.

डोंगरी भागात उष्णता अधिकगतवर्षी पूर्ण देशातच तापमान सरासरीपेक्षा ०.५१ अंश सेल्सिअस अधिक नोंदले गेले. २०१६ मध्ये नोंदल्या गेलेल्या ०.७१ अंश सेल्सिअस तापमानापेक्षा हे कमी होते. मात्र, गतवर्षी डोंगरी भागात उष्णता अधिक होती. गत १०० वर्षांची सरासरी पाहिली तर हिमाचलमध्ये सर्वाधिक १.५ अंश सेल्सिअस तापमान वाढले. देशात गतवर्षी मार्च-एप्रिलमध्ये सहा दिवस कमाल तापमान सामान्यपेक्षा ३ ते ८ अंश सेल्सिअस अधिक राहिले. त्रिपुरा, गोवा, पंजाब, नागालँड व सिक्कीममध्ये जीवित व वित्त हानी कमी झाली.

राजस्थानात उष्णता, पावसाच्याही धाराराजस्थानात गतवर्षी उष्णता अधिक होती. तसेच, पाऊसही जोरदार बरसला. राज्यात सरासरी तापमान २४.० अंश सेल्सिअस राहिले. हे प्रमाण सरासरीच्या ०.३ अंश सेल्सिअस अधिक आहे. राजस्थानात हे १९०१ नंतरचे १३ वे सर्वांत उष्णतेचे वर्ष ठरले. दोन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ६० टक्के, २२ जिल्ह्यांत सरासरीच्या २० ते ५९ टक्के पाऊस झाला. ९ जिल्ह्यांत मान्सून सामान्य राहिला. पावसाची सरासरी ४८६.६ मिमी आहे.