शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपनं डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणुका घेतल्या तर...', ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 18:10 IST

ममतांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीची शक्यता व्यक्त केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) डिसेंबर महिन्यातच लोकसभा निवडणूका घेतल्या, तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या सोमवारी (28 ऑगस्ट) कोलकाता येथे बोलत होत्या.

ममतांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर निशाणा साधत बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, राज्यपाल घटनात्मक नियमांचे उल्लंघन करत आहेत, मी या पदाचा आदर करते, पण त्यांच्या असंवैधानिक कारवायांचे समर्थन करत नाही."भाजपने बुक केली आहेत सर्व हेलिकॉप्टर - " याच वेळी, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इतर राजकीय पक्षांना प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर करता येऊ नये, म्हणून भाजपने आधीच सर्व हेलिकॉप्टर बुक केली आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्ही बंगालमधून सीपीआय(एम)ला हटवले. आता लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करू. भाजपने आपल्या देशाला आधीच सामुदायिक कटूतेचा देश बनवले आहे. जर ते पुन्हा सत्तेवर आले, तर आपला देश द्वेषाचा देश बनेल.

 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक