शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

...तर अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 07:06 IST

लवकरात लवकर निकाल देण्याचं सर्वोच्च न्यायालयाला आवाहन

लखनऊ: अयोध्या प्रकरणाचा निकाल 24 तासांच्या आत लावून दाखवण्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. राम मंदिराच्या प्रश्नावर लोकांचा संयम संपत आला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय याबद्दलचा निकाल देत नाही. त्यामुळे हे प्रकरण आमच्याकडे सोपवा. चोवीस तासांच्या आत या प्रश्नावर मार्ग काढू, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. अयोध्या प्रश्नावर मार्ग कसा निघणार? संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटणार की आणखी काही करणार?, असे प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आले. त्यावर न्यायालयाला हे प्रकरण आमच्याकडे सोपवू तर द्या, असं उत्तर आदित्यनाथ यांनी दिलं. 'हा वाद लवकर संपुष्टात आणावा, असं आवाहन मी न्यायालयाला करतो. रामजन्मभूमीच्या वादावार अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं 30 सप्टेंबर 2010 मध्ये आदेश दिलेला नाही. हिंदू मंदिर नष्ट करण्यासाठी इथे बाबरी मशीद उभारण्यात आली, ही बाब न्यायालयानं स्वीकारली आहे. उच्च न्यायालयाच्या सुचनेवरून पुरातत्व विभागानं त्या ठिकाणी खोदकाम केलं. हिंदू मंदिर किंवा स्मारक नष्ट करण्यासाठीच बाबरीचा ढाचा उभारला गेला, असा अहवाल पुरातत्व विभागानं न्यायालयाला दिला आहे,' असं योगी म्हणाले. अयोध्या प्रकरणात न्यायालयानं लवकरात लवकर निकाल द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. 'निकाल देण्यासाठी अनावश्यक विलंब झाल्यास लोकांचा संस्थांवरील विश्वास उडेल. त्यामुळे संकट निर्माण होत आहे,' असं योगी म्हणाले. 'न्यायालयाला लवकर निकाल देणं जमत नसेल, तर त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे सोपवावं. आम्ही अवघ्या 24 तासांमध्ये या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकू,' असा दावा त्यांनी केला. या प्रकरणी मोदी सरकारनं अध्यादेश का आणला नाही, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना योगींनी पुन्हा न्यायालयाचा उल्लेख केला. न्यायप्रविष्ट प्रकरणांवर संसदेत चर्चा होऊ शकत नाही. आम्ही हा विषय न्यायालयावर सोडला आहे, असं ते म्हणाले.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय