आम्ही कोणाला घाबरणार नाही - निवडणूक आयुक्त

By admin | Published: May 8, 2014 05:18 PM2014-05-08T17:18:06+5:302014-05-08T17:20:41+5:30

भाजपने केलेल्या पक्षपातीपणाच्या आरोपांवर नाराजी व्यक्त करतानाच आम्ही कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीला घाबरणार नाही असे वक्तव्य निवडणूक आयोगाने आयुक्त व्ही.एस. संपत यांनी केले आहे.

We will not be afraid of anyone - the Election Commissioner | आम्ही कोणाला घाबरणार नाही - निवडणूक आयुक्त

आम्ही कोणाला घाबरणार नाही - निवडणूक आयुक्त

Next
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ८ - भाजपने केलेल्या पक्षपातीपणाच्या आरोपांवर नाराजी व्यक्त करतानाच आम्ही कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीला घाबरणार नाही असे वक्तव्य निवडणूक आयोगाने आयुक्त व्ही.एस. संपत यांनी केले आहे. वाराणसीतील डेनिया बाग येथे सभेला परवानगी न देण्याचा निर्णय योग्य असल्याने स्थानिक निवडणूक अधिका-यावर कारवाईचा प्रश्नच येत नाही असे  संपत यांनी म्हटले आहे. 
लोकसभा निवडणुकीत पार पडलेले मतदानाचे आठ टप्पे आणि नरेंद्र मोदींनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपक यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी भाजपच्या आरोपांवर भाष्य केले आहे. संपत म्हणाले, काही राजकीय पक्ष व ज्येष्ठ नेत्यांनी आमच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. आम्ही पक्षपाती असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र निवडणूक आयोग लोकशाहीचा स्तंभ असून निवडणुका निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले. 
वाराणसीतील सभेला परवानगी नाकारण्याच्या आयोगाच्या वादग्रस्त निर्णयावरही संपत यांनी स्पष्टीकरण दिले. स्थानिक निवडणूक अधिका-यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर डेनिया बाग येथील सभेला परवानगी नाकारली आहे. फक्त कोणी आरोप केले म्हणून त्या अधिका-यावर कारवाई होणार नाही असेही त्यांनी सांगितले. तर मतदाना दरम्यान मतदान केंद्रात जाणा-या राहुल गांधींसंदर्भात चौकशी करुन योग्य निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: We will not be afraid of anyone - the Election Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.