शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

देश तोडणाऱ्या जिनांचं उदात्तीकरण कशासाठी?- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 12:01 IST

जिनांचा छायाचित्र लावण्यावरून मोठा वादंग

नवी दिल्ली: अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मोहम्मद अली जिनांच्या छायाचित्रावरुन निर्माण झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. देश तोडणाऱ्या जिनांचं उदात्तीकरण कशासाठी?, असा प्रश्न उपस्थित करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या वादात उडी घेतलीय. 'जिनांमुळे देशाची फाळणी झाली. अशा व्यक्तीचं कर्तृत्व आपण कसं काय साजरं करू शकतो?,' असा सवाल आदित्यनाथ यांनी विचारलाय. ते कर्नाटकमध्ये बोलत होते. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात मोहम्मद अली जिनांचं छायाचित्र लावण्यावरुन झालेल्या वादाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आदित्यनाथ यांनी दिली. चौकशीचा अहवाल येताच त्वरित कारवाई करण्यात येईल, असंही ते म्हणाले. 'या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. देशाची फाळणी करणाऱ्या जिनांचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नाही,' असंही त्यांनी सांगितलं. ते इंग्रजी वृत्तवाहिनी इंडिया टुडेसोबत बोलत होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ बंगळुरूत दाखल झालेत. वारंवार होत असलेल्या वादांमुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून जिनांचं छायाचित्र हटवण्यात आलं. परिसरात स्वच्छता सुरू असल्याचं कारण यासाठी देण्यात आलं. विद्यापीठाच्या वातावरणातील तणाव वाढत असल्यानं बुधवारी याठिकाणी आरएएफच्या दोन कंपनी तैनात करण्यात आल्या. मंगळवारी विद्यापीठ परिसरात मोठं आंदोलन झालं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीदेखील केली होती.   

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ