शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही कधीही लग्न करणार नाही’’, १२ तरुणींनी घेतला अजब निर्णय, कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:32 IST

Haryana News: फरिदाबादमधील सराय येथील १२ तरुणींनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या एकच चर्चा सुरू आहे. या तरुणींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आता कधीही लग्न करणार नाहीत. लग्नापेक्षा स्वत:च्या पायावर उभं राहणं आणि समाजासाठी चांगलं काम करण्याची अधिक आवश्यकता आहे, असं या तरुणींचं मत आहे.

फरिदाबादमधील सराय येथील १२ तरुणींनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या एकच चर्चा सुरू आहे. या तरुणींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आता कधीही लग्न करणार नाहीत. लग्नापेक्षा स्वत:च्या पायावर उभं राहणं आणि समाजासाठी चांगलं काम करण्याची अधिक आवश्यकता आहे, असं या तरुणींचं मत आहे. या मुलींच्या गटामधील एक सदस्य असलेल्या मीनू गोयल हिने आम्ही एक समाजसेवा करत आहोत, असं सांगितलं. 

मीनू गोयल हिने सांगितले की, मी आता कधीही विवाह करणार नाही. आम्ही १२  तरुणी एकत्र मिळून समाजासाठी काम करत आहोत. आम्हा सर्वांचं आपापलं काम आहे. तसेच आम्ही सर्वांनी खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. मीनूने सांगितलं की, लग्न करणं हे इतकं महत्त्वाचं नाही. तर  स्वत:च्या पायावर उभं राहणं आणि समाजाची सेवा करणं हे अधिक आवश्यक आहे. मीनू हिचं वय सध्या ३० वर्षे आहे. तसेच या वयात लग्न नाही तर समाजासाठी काम करणं महत्त्वाचं असल्याचं मत तिने मांडलं आहे.

मीनू गोयल हिच्या कुटुंबामध्ये चार बहिणी एक भाऊ आणि एक पुतण्या आहे. मीनू या सर्वांमधील तिसरं भावंड आहे. तिच्या दोन बहिणींचा आधीच विवाह झालेला आहे.  मीनू सांगते की, आपल्या मुलांनी वेळेत लग्न करावं, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. मात्र आपलं लेकरू समाजासाठी काही तरी करत आहे, हे पाहतील, तेव्हा ते खूश होतील. मीनू हिने सांगितलं की, तिला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे. तसेच आपली मुलगी समाजासाठी काहीतरी करते आहे, याचा त्यांना अभिमान आहे.

मीनू सांगते की, त्यांना आता केवळ समाजासाठी काम करायचं आहे. त्यांचा उद्देश लोकांची मदत करणे आणि समाजामध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणणे हाच आहे. त्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती संघर्ष करते, तेव्हा समाज त्यांना खऱ्या उद्देशासह येऊन भेटतो. अशा प्रकारे मीनू आणि तिच्या सहकारी समाजासाठी प्रेरणा बनल्या आहेत.  

टॅग्स :marriageलग्नHaryanaहरयाणा