शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"तर आम्ही पक्ष सोडू..."; कमलनाथ यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:30 IST

Kamalnath : भारतीय जनता पक्षामध्ये सामील होण्याबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी बुधवारी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

भारतीय जनता पक्षामध्ये  (भाजप) सामील होण्याबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी बुधवारी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कमलनाथ यांनी सांगितलं की, मी त्यांच्यावर "स्वतःला लादणार नाही" आणि त्यांना हवं असल्यास ते "पक्ष सोडतील". छिंदवाडा येथील हर्रई येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना त्यांनी अनेक वर्षांपासून त्यांना कार्यकर्त्यांचं प्रेम आणि विश्वास मिळत असल्याचं सांगितलं.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की, “जर तुम्हाला कमलनाथ यांना निरोप द्यायचा असेल तर ती तुमची मर्जी आहे. मी जायला तयार आहे. मी स्वतःला तुमच्यावर लादू इच्छित नाही. हा तुमच्या मर्जीचा विषय आहे.'' कमलनाथ यांचा मुलगा छिंदवाडा मतदारसंघातून खासदार आहे. त्यांचा मुलगा पुन्हा या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचं कमलनाथ यांनी आधीच जाहीर केलं होतं.

छिंदवाडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस नेत्याने सांगितलं की, भाजपा स्वत:ला आक्रमकपणे सादर करत आहे, परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी घाबरू नये. "भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्याला मतदान करावं लागेल आणि माझा तुमच्या सर्वांवर विश्वास आहे" असं म्हटलं आहे. 

कमलनाथ म्हणाले की, "अयोध्येतील रामाचे मंदिर सर्वांचे आहे आणि भाजपने त्याच्या उभारणीचे श्रेय घेऊ नये. राम मंदिर भाजपचे आहे का? ते माझ्यासह सर्वांचे आहे. हे मंदिर जनतेच्या पैशातून बांधण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि ते (भाजप) सत्तेत असल्याने त्यांनी मंदिर बांधले. आम्ही प्रभू रामाची पूजा करतो आणि छिंदवाडा येथील भूमीवर हनुमानाचं मोठं मंदिर बांधलं आहे." 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण