शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही प्राणसुद्धा देऊ - फारुख अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 11:15 IST

सतत वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे.

ठळक मुद्देतुम्ही आमच्याबरोबर न्याय करा हेच आम्ही या दोन देशांना सांगत आहोत असे अब्दुल्ला म्हणाले. आता तुम्ही नव्या पिढीचा सामना करत आहात जे बंदुकीला घाबरत नाहीत.

श्रीनगर - सतत वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे. काश्मीरमधील योद्धे (दहशतवादी) आपल्या हक्कासाठी बलिदान देत आहेत. ही आमची भूमी असून आम्ही याचे मालक आहोत. आमदार, खासदार किंवा मंत्री बनण्यासाठी आमची मुले बलिदान देत नाहीयत असे विधान अब्दुल्ला यांनी शुक्रवारी श्रीनगरमध्ये केले.  आम्हाला आमची भूमी परत द्या. विसरु नका हे योद्धे (दहशतवादी) स्वातंत्र्यासाठी सर्व काही सोडून आले आहेत. 

कोणालाही मरण्याची इच्छा नसते. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ शकतो. पण हे कधी भारताला आणि पाकिस्तानलाही समजणार नाही. 1931 पासून ही लढाई सुरु झाली आहे. आम्ही कोणाचेही शत्रू नाही. पण तुम्ही आमच्याबरोबर न्याय करा हेच आम्ही या दोन देशांना सांगत आहोत असे अब्दुल्ला म्हणाले. 

1948 साली तुम्ही जो शब्द दिला होता तो विसरलात. आता तुम्ही नव्या पिढीचा सामना करत आहात जे बंदुकीला घाबरत नाहीत. ज्यांना काश्मीरला स्वतंत्र करायचे आहे असे अब्दुल्ला म्हणाले. 

फक्त पाकिस्तान कुठे गोळीबार करतो, आपणही करतोच की!यापूर्वीही अब्दुल्ला यांनीही अशीच वादग्रस्त विधाने केली आहेत.  सीमारेषेवर एकट्या पाकिस्तानकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन होते असे नाही. भारताच्या बाजूनेही अनेकदा गोळीबार केला जातो, असे वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. नोव्हेंबरमध्ये फारुख अब्दुल्लांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा पाकिस्तानचा भाग असून पीओकेला पाकपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे विधान केले होते.  

पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नाही गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानमध्ये कट रचण्यात आल्याचा दावा फारुख अब्दुल्ला यांनी फेटाळून लावला आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानची बाजू घेत पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नसल्याचा अजब दावा केला. उलट नरेंद्र मोदीच पाकिस्तानात गेले होते अशी टीका केली.  

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्ला