शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

भाजपची सर्व कारस्थाने आम्ही हाणून पाडू : काँग्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 06:27 IST

४५ पदांसाठी थेट भरती रद्द करण्याच्या निर्णयानंतर टीका 

नवी दिल्ली: राज्यघटनेचे सामर्थ्य हुकूमशाही प्रवृत्तीच्या राजवटीच्या अहंकाराचा पराभव करू शकते, हे ४५ पदांसाठी थेट भरतीची प्रक्रिया व त्याची जाहिरात रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्यावरून दिसून आले, अशी टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या अन्य नेत्यांनी केली आहे. 

राहुल गांधी यांनी म्हटले की, राज्यघटना व आरक्षण या दोन्ही गोष्टींचे काँग्रेस प्राणपणाने रक्षण करणार असून भाजपाची सर्व कारस्थाने आम्ही हाणून पाडू. केंद्र सरकारच्या मंत्रालयांमध्ये विविध पदांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची होणारी थेट भरती तसेच ती जाहिरातही रद्द करावी असा आदेश देणारे पत्र मंत्री जितेंद्र सिंह यांनी यूपीएससीच्या अध्यक्ष प्रीती सूदन यांना लिहिले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे उद्‌गार काढले आहेत.

पत्रावर तारीखच नाही : काँग्रेस सिंह यांनी यूपीएससीच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावर तारीखच नमूद नाही. या सरकारचा कारभार अतिशय वाईट आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेमुळेच यूपीएससीकडून होणारी थेट भरती सरकारला रद्द करावी लागली, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी केला.

मंत्री चिराग पासवान यांनी मानले पंतप्रधानांचे आभार केंद्रीय खात्यांमधील विविध ४५ पदांसाठी करण्यात येणारी थेट भरती रद्द केल्याबद्दल केंद्रीय मंत्री व लोक जनशक्त्ती पार्टीचे (राम- विलास पासवान) अध्यक्ष चिराग पासवान यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ते म्हणाले की, एससी, एसटी व मागास- वर्गीय गटातील लोकांना वाटणारी चिंता ओळखून मोदी यांनी योग्य तो निर्णय घेतला. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचे नियम पाळूनच भरती करण्यात आली पाहिजे, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी या विषयावर सविस्तर चर्चा केली, असेही चिराग पासवान यांनी सांगितले.

भारतीय राज्यघटना चिरायू होवो : खरगे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, भारतीय राज्यघटना चिरायू होवो असे याप्रसंगी म्हणावेसे वाटते. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी काँग्रेस लढा देत आहे. या गटांचे आरक्षण हिरावून घेण्याचा भाजपचा डाव आम्ही हाणून पाडला आहे. भारतीय राज्यघटनेच्या सामर्थ्यामुळे हुकूमशाही राजवटीच्या अहंकाराचा पराभव झाला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस