शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 19:17 IST

रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत भारताने अमेरिकेला चोख उत्तर दिले आहे. 'भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील. तेल कुठून खरेदी करायचे हा आमचा निर्णय असेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

रशियाकडून तेल खरेदीवरुन भारतावर अमेरिकेचा दबाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवला आहे. दरम्यान, आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी एक मोठे विधान केले आहे. भारत रशियन तेल खरेदी करत राहील. देश त्यांच्या ऊर्जेच्या गरजा आणि हितसंबंधांवर आधारित निर्णय घेईल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. 

'भारत रशियन तेल खरेदी करत राहील. आपल्याला आपल्या गरजांनुसार तेल कुठून खरेदी करायचे हे ठरवावे लागेल. हा आमचा निर्णय असेल, असे सीतारमण यांनी एका मुलाखतीत सांगितले. मोठ्या प्रमाणात शुल्क असूनही, भारत अमेरिकेच्या दबावाखाली येणार नाही, असेच या विधानवरुन दिसत आहे.

पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...

अमेरिकेने २७ ऑगस्टपासून भारतावर ५० टक्के कर लादला आहे. यामध्ये, रशियन तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून २५ टक्के कर लादण्यात आला आहे आणि २५% परस्पर कर आहे. ट्रम्प प्रशासनाने काही दिवसापूर्वी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर लादण्यात आला आहे. युक्रेन युद्धाशी संबंधित राष्ट्रीय आणीबाणी हाताळता यावी आणि त्या युद्धग्रस्त देशात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न बळकट करता यावेत यासाठी आयईईपीए अंतर्गत भारतावर हा कर लादण्यात आला आहे, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. 

तेल खरेदी करण्यावरुन टॅरिफ लावले

भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करत आहे आणि ते इतर देशांना चढ्या किमतीत विकत आहे. भारताची खरेदी रशियाला आर्थिक मदत करत आहे, यामुळे युक्रेनविरुद्धच्या युद्धात त्यांना मदत होत आहे, असा आरोप अमेरिकेने केला. भारताने रशियन तेल खरेदी करणे पूर्णपणे न्याय्य आहे. भारताने आधीच आपल्या उत्तरात म्हटले आहे की रशियन तेल खरेदी करणे पूर्णपणे कायदेशीर आहे आणि त्यावर कोणतेही आंतरराष्ट्रीय निर्बंध नाहीत.  रशियन तेल भारताला खूप मदत करत आहे. रशियन तेल खरेदी केल्याने जगातील तेलाच्या किमती नियंत्रणात राहिल्या, यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था सुरक्षित राहिली.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया