शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:21 IST

India-US Relationship: भारताने रशियाकडून तेलखरेदी सुरूच ठेवली तर भारतावर ५०० टक्के टॅरिफ आकारलं जाईल, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीला आता भारतानं थेट उत्तर दिलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात झाल्यापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे बिघडलेले आहेत. त्यात ऑपरेशन सिंदूरवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे भारताने फेटाळल्याने तसेच  ट्रम्प यांच्या विरोधानंतरही रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने भारत आणि अमेरिकेतील तणाव विकोपाला गेलेला आहे. त्यातच आता भारताने रशियाकडून तेलखरेदी सुरूच ठेवली तर भारतावर ५०० टक्के टॅरिफ आकारलं जाईल, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीला आता भारतानं थेट उत्तर दिलं आहे. कुणाच्या दवाबाखाली भराताचं ऊर्जा धोरण बदलणार नाही. आम्ही आपल्या १४० कोटी जनतेच्या हितांचं रक्षण करण्यासाठी स्वस्त इंधनाचे स्रोत शोधत राहू, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार  भारत सरकार अमेरिकेच्या सेंक्शनिंग रशिया अॅक्ट २०२५ वर लक्ष ठेवून आहे. रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, आमचं इंधनाच्या खरेदीसाठीचं धोरण पूर्णपणे स्पष्ट आहे. तसेच आम्ही जागतिक बाजारातील चढऊतार आणि आपल्या गरजांच्या हिशेबाने निर्णय घेतो. भारत कुठल्याही देशाकडून तेल खरेदी करण्यासाठी स्वतंत्र आहे. तसेच स्वस्त उर्जेच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षितलेला सुनिश्चित करण्याला आमचं प्राधान्य आहे. भारत आपल्या ऊर्जेच्या गरजेसाठी जगभरातील बाजारांचा आढावा घेत आहे. आम्ही १४० कोटी लोकांच्या ऊर्जेच्या गरजेसोबत तडजोड करू शकत नाही.

याबरोबरच अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांनी हल्लीच केलेल्या विधानांनांही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेली माहिती पुरेशी अचूक नाही.  दोन्ही देशांदरम्यान, १२ फेब्रुवारी २०२५ पासूनच ट्रेड कराराबाबत चर्चा सुरू आहे. यादरम्यान, अनेकदा दोन्ही देश कराराच्या खूप जवळ पोहोचले होते, असेही त्यांनी सांगितले.  अमेरिकन प्रशासनाकडून व्यापार करारावरील चर्चेस होत असलेल्या उशिरासाठी भारताला जबाबदार ठरवण्यात येत असल्याचा पार्श्वभूमीवर भारताकडून हे उत्तर स्पष्टपणे देण्यात आलं आहे.  तसेच दोन्ही देशांचा फायदा होईल, अशा करारासाठी आम्ही तयार आहोत, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय