शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
5
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
6
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
7
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
8
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
9
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
10
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
11
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
12
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
13
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
14
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
15
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
16
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
17
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
18
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
19
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
20
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 

आम्ही 'फक्त' नमस्ते करायला हात उचलतो, एअर इंडियाची इंडिगोवर उपरोधिक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 11:14 AM

'आम्ही फक्त नमस्ते म्हणण्यासाठीच हात उचलतो’ अशा कॅप्शनसह एअर इंडियाने त्यांचा मॅस्कॉट ‘महाराजा’चा फोटो ट्विटर, इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ठळक मुद्देदिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याकडून एका प्रवाशाला धक्काबुक्की करण्यात आली होती. सोशल मीडियावर या मारहाणीवरून खिल्लीही उडवली जाते आहे.

मुंबई-  दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याकडून एका प्रवाशाला धक्काबुक्की करण्यात आली होती. प्रवाशाला मारहाण करण्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत असून सोशल मीडियावरही लोक या प्रकरणी आपली मतं मांडत आहे. तसंच सोशल मीडियावर या मारहाणीवरून खिल्लीही उडवली जाते आहे.  या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंडिगो एअरलाईन्सवर अनेकांकडून टीका होत आहे. त्यानंतर इंडिगोने माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं. दुसरीकडे, हवाई वाहतूक क्षेत्रातील इंडिगोची प्रतिस्पर्धी असलेल्या एअर इंडियाने या सगळ्या प्रकारावर उपरोधिकपणे टीका केली आहे.

'आम्ही फक्त नमस्ते म्हणण्यासाठीच हात उचलतो’ अशा कॅप्शनसह एअर इंडियाने त्यांचा मॅस्कॉट ‘महाराजा’चा फोटो ट्विटर, इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तर ‘अनबीटेबल सर्व्हिस’ या दुसऱ्या फोटोतूनही इंडिगोवर निशाणा साधण्यात आला आहे. या पोस्टमध्ये इंडिगोच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. पण, नुकताच झालेला प्रकार पाहता या टीकेचा रोख इंडिगोवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय, जेट एअरवेजच्या नावेही अशाचप्रकारचे एक ट्विट व्हायरल होत आहे. यामध्ये, जेट एअरवेजचा लोगो असलेल्या चित्रावर ‘वी बीट अवर कॉम्पिटिशन, नॉट यू’ असा सूचक ओळी लिहण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही ट्विटस सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.

नेमकं प्रकरण काय ?राजीव कात्याल या प्रवाशाने चेन्नईतून दिल्लीला येण्यासाठी 6E 487 या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केलं. विमानातून उतरल्यानंतर कात्याल यांचा इंडिगोच्या एका कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कात्याल यांनी शिवी दिल्याचा आरोप इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी केला. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे कात्याल आणि कर्मचारी यांच्यात वाद सुरु असताना या कर्मचाऱ्यांनी त्यांना बसमध्ये जाऊ दिलं नाही. त्यानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यांना धक्काबुक्की केली.