शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच पुनर्परीक्षेचा निर्णय घेतला, CBSE प्रमुखांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 21:56 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या प्रमुख अनिता करवाल यांनी सार्वजनिक विधान केलं आहे. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता पुनर्परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अद्याप परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. आम्ही विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करत आहोत.

नवी दिल्ली-  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चा दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानं या विषयांच्या पुनर्परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकारावर मौन धारण केलेल्या CBSEनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या प्रमुख अनिता करवाल यांनी सार्वजनिक विधान केलं आहे.त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता पुनर्परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अद्याप परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. आम्ही विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करत आहोत. लवकरच परीक्षेच्या नव्या तारखांचीही घोषणा करू. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे दोन्ही पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर विरोध प्रदर्शनही केलं होतं. पोलीसही या पेपर फुटीप्रकरणी गांभीर्यानं तपास करतंय. पेपरफुटीमागे दिल्लीतल्या कोचिंग सेंटरचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गुरुवारी अनेक कोचिंग सेंटर्सवर छापेमारी केली आहे.क्राइम ब्रँचनं एका कोचिंग सेंटरच्या मालकासोबतच 18 विद्यार्थ्यांसह 25 लोकांकडे चौकशी केली आहे. त्यानंतर सरकारनं या प्रकरणावर खुलासा केला आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, पेपरफुटीची घटना फारच दुखद आहे. त्या पेपरफुटीमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. मी स्वतः एका विद्यार्थ्याचा पालक आहे. या प्रकारामुळे मला रात्रीची झोपही लागत नाही. पेपरफुटी प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही. पोलीस लवकरच दोषींचा अटक करेल. या प्रकरणात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या अधिका-यांचीही चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :CBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणCBSE Examsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा