शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला कोणती खुर्ची नको, भाजपची राजवट घालवायचीय", 'बेटी बचाओ'वरून ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 15:06 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही सहभाग आहे. पण विरोधकांच्या आघाडीचा चेहरा कोण असेल या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधकांना डिवचत आहेत. अशातच मणिपूरमधील हिंसाचारची क्रूरता, महिलांवरील अत्याचार आणि जाळपोळ यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला घेरले आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत टीकास्त्र सोडले. 

मणिपूर हिंसाचारावरून ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदींचे नाव न घेता ममता म्हणाल्या, "भाजपाने 'बेटी बचाओ'चा नारा दिला होता, आता तो नारा कुठे आहे? आज मणिपूर जळत आहे. तसेच बिल्किस बानो प्रकरणात आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. ब्रिजभूषण सिंह यांना देखील कुस्ती प्रकरणात जामीन मिळाला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत देशातील महिला तुम्हाला देशाच्या राजकारणातून फेकून देतील", असा घणाघात त्यांनी केला. 

ममता बॅनर्जींचं टीकास्त्र दरम्यान, आम्हाला कोणत्याही खुर्चीचा मोह नसून भाजपाची ही राजवट घालवायची आहे, असेही ममता  बॅनर्जींनी म्हटले. "भाजपाने पश्चिम बंगालमध्ये अनेक केंद्रीय पथके पाठवली, पण मणिपूरला केंद्रीय पथक का पाठवले नाही? मला पंतप्रधान मोदींना विचारायचे आहे की, मणिपूरमधील घटनेने तुम्ही थोडे देखील दुखावला नाहीत का? तुम्ही पश्चिम बंगालकडे नेहमी बोट दाखवता पण तुम्हाला माता बहिणींवर प्रेम नाही का? कधीपर्यंत अशा मुली जळणार, दलित, अल्पसंख्याक मारले जाणार, शेकडो माणसं मारली जाणार? आम्ही मणिपूरकडे दुर्लक्ष करणार नाही कारण ईशान्येकडील बहिणी आमच्या बहिणी आहेत", अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीManipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीWomenमहिलाBJPभाजपा