शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

खासगीकरण न झाल्यास एअर इंडिया बंद करावी लागेल; सरकारची संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 21:03 IST

एअर इंडियावर तब्बल ६० हजार कोटींचं कर्ज; कंपनी डबघाईला

नवी दिल्ली: विमान दुरुस्ती विधेयकाला (Aircraft Amendment Bill 2020) राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मार्चमध्येच विधेयक संमत केलं होतं. आता राज्यसभेत विधेयक पारित झाल्यानं त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड झाल्यास जबर दंड आकारण्याची तरतूद विधेयकात आहे. या विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा झाली. त्यावेळी नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरींनी विधेयकातल्या तरतुदींबद्दल महत्त्वाची माहिती दिली.हरदीप सिंग पुरींनी कर्जाच्या ओझ्यामुळे डबघाईला आलेल्या एअर इंडियाबद्दलही भाष्य केलं. 'एअर इंडियाची सध्याची स्थिती पाहता केवळ दोनच पर्याय सरकारकडे आहेत. एक तर केंद्र सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करेल किंवा ही कंपनीच बंद करेल. सध्याच्या घडीला सरकारकडे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत,' असं पुरी म्हणाले. एअर इंडियावर असलेल्या कर्जाचा आकडा पाहता सरकार कंपनीला कोणतीही मदत करू शकत नाही. एअर इंडिया सुरू ठेवण्यासाठी कंपनीचं खासगीकरण करावं लागेल. तसं न झाल्यास नाईलाजास्तव सरकारला कंपनी बंद करावी लागेल, असं पुरींनी संसदेला सांगितलं.एअर इंडियावर ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यामुळे आमच्याकडे अतिशय मोजके पर्याय शिल्लक आहेत. एअर इंडियाचं खासगीकरण होईल. त्याला नवा मालक मिळेल आणि कंपनी पुन्हा एकदा भरारी घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील विमानतळांचं खासगीकरण म्हणजे हवाई वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाची मक्तेदारी निर्माण करण्याचा डाव असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. या टीकेला पुरी यांनी उत्तर दिलं. देशातील एकूण हवाई वाहतुकीचा विचार केल्यास, मुंबई आणि दिल्लीचा वाटा ३३ टक्के इतका आहे. तर अदानी समूहाच्या ताब्यात गेलेल्या ६ विमानतळांचा वाटा केवळ ९ टक्के आहे, अशी आकडेवारी पुरी यांनी सांगितली. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया